Home /News /entertainment /

‘गंगूबाई काठियावाडी’ वादाच्या भोवऱ्यात; आलिया भट्ट विरोधात आंदोलन सुरु

‘गंगूबाई काठियावाडी’ वादाच्या भोवऱ्यात; आलिया भट्ट विरोधात आंदोलन सुरु

आलिया एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

    मुंबई 7 मार्च: आलिया भट्ट (Alia Bhatt) ही बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आलिया एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कामाठीपुरा (Kamathipura) या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कामाठीपुराबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामाठीपुरा येथे काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेनं या चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. कामाठीपुरा येथे कुठलेही अवैद्य व्यवहार केले जात नाहीत. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या माध्यमातून कामाठीपुराबाबत खोटी माहिती पसरवली जात आहे. मोठे प्रयत्न करुन या ठिकाणच्या नागरिकांनी आपली चुकीची प्रतिमा बदलली आहे. मात्र या चित्रपटामुळं लोकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवलं जाणार आहे. या चित्रपटामुळं कमाठीपुराचं वर्तमानच नव्हे तर भविष्यदेखील धोक्यात येईल, असे आरोप या संस्थेनं चित्रपटावर केले आहेत. यापूर्वी गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. शिवाय संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन झैदी यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. अवश्य पाहा - Alia Bhatt झाली बिझनेस वुमन! फक्त अभिनयच नव्हे तर स्वतःचं प्रॉडक्शन कोण होती गंगुबाई काठियावाडी? ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भंन्साळी यांनी केलं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या 16 व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ 500 रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरातच वेश्या व्यवसाय करत असताना गंगूबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधली. आपल्या या बहिणीला मग करीम लालाने अवघा कामाठीपुराच हातात दिला, असे सांगितले जाते. गंगूबाईंनी हा व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नाही. उलट, मुंबईतून वेश्या व्यवसायच काढून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाचे नेतृत्वही गंगूबाईंनी केले होते. अशा गंगूबाईंची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Alia Bhatt, Crime, Entertainment, Gangubai kathiawadi, Kamathipura brothel

    पुढील बातम्या