मुंबई 20 मार्च: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार येत्या काळात एक दोन नव्हे तर तब्बल चार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘सूर्यवंशी’, ‘बच्चन पांडे’, ‘बेलबॉटम’ आणि त्यानंतर ‘रामसेतू’ या चार धमाकेदार चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. मात्र त्याच्या या चित्रपटांवर अभिनेता कमाल आर. खान यानं निशाणा साधला आहे. “तुझ्याकडे आता केवळ तीन-चार वर्षच उरली आहेत. वाट्टेल तेवढी मजा करुन घे,” असा उपरोधिक टोला त्यानं लगावला आहे. कमाल आर खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर तो रोठकोपणे प्रतिक्रिया देतो. अनेकदा यामुळं त्याला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी त्यानं अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. अवश्य पाहा - रणबीर-आलियाच्या लग्नाला महेश भट्ट यांचा विरोध; समोर आलं हे कारण…
“अक्षय कुमारच्या चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी कोणी मिळत नाही. त्याचा सूर्यवंशी आणि बेलबॉटम चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. तो एकापाठोपाठ एक नव्या चित्रपटांची घोषण करतोय. कारण आता पैसे कमावण्यासाठी अक्षयकडे 2 ते 3 वर्षच शिल्लक आहेत. वेडे निर्माते त्याला चित्रपटासाठी 125 कोटी रुपये देतात” अशा आशयाचं ट्विट करुन कमाल खाननं अक्षय कुमारवर जोरदार टीका केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अक्षयच्या चाहत्यांनी या ट्विटवर संताप व्यक्त केला मात्र खुद्द अक्षयनं मात्र अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.