जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'कल हो ना हो'मधला हा छोटा 'शिव' आठवतोय का? पाहा सध्या काय करतोय अथित नाईक

'कल हो ना हो'मधला हा छोटा 'शिव' आठवतोय का? पाहा सध्या काय करतोय अथित नाईक

'कल हो ना हो'मधला हा छोटा 'शिव' आठवतोय का? पाहा सध्या काय करतोय अथित नाईक

शिव म्हणजेच अभिनेता अथित नाईक (Athit Naik). अथित आता अभिनय करत नसला तरीही तो सिनेसृष्टीत सक्रिय आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 29 जून : 2003 साली आलेला चित्रपट ‘कल हो ना हो’ (Kal Ho Na Ho) आजही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे.  शाहरुख खान (Shahrukh Khan), प्रीती झिंटा (Preity Zinta), सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची केमिस्ट्री ही सुपरहिट ठरली होती. पण चित्रपटातील प्रीती झिंटा चा लहान भाऊ शिव आठवतोय का? आता शिव मोठा झाला आहे पण तो अभिनय करत नाही. शिव म्हणजेच अभिनेता अथित नाईक (Athit Naik). अथित आता अभिनय करत नसला तरीही तो सिनेसृष्टीत सक्रिय आहे. त्याने आता अभिनय न करता दिग्दर्शन आणि छायांकन यात रस घेतला आहे. काही शॉर्ट फिल्म्स त्याने दिग्दर्शित केल्या आहे. ज्या कान्स फिल्म (Cannes) फेस्टिव्हलमध्ये गेल्या होत्या.

जाहिरात

अथितने 2014 साली कोलंबिया विद्यापीठातून पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्याने फोटोग्राफी, सिनेमाटोग्राफी या विषयांत रुची निर्माण केली. अथितने डॉक्टर अक्षदा कदम नाईक हिच्याशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर तो फार ॲक्टिव असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने दिग्दर्शक करण जोहर सोबत चित्रपटाच्या सेटवरील त्याचा बालपणीचा फोटो शेअर करत करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय शाहरुख खान सोबत काही जुने फोटो ही शेअर केले होते.

अभिनय का सोडला असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता तेव्हा त्याने सांगितलं की, “मला जाणीव झाली की अभिनय क्षेत्रात खूप टॅलेंट भरलेलं आहे. पण जगाला आणखी कथा संगणाऱ्यांची आणि कॅमेऱ्यामागे काम करणाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे मी जास्त वेळ डीओपी सोबत घालवायला सुरुवात केली. आतापर्यंत माझ्या 3 शॉर्टफिल्म कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्या आहेत. मी एक आनंदी व्यक्ती आहे. आणि अभिनय सोडल्याच मला अजिबात वाईट वाटत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात