• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO:वडिलांच्या मास्क उतरवण्यावर भडकली जान्हवी कपूर; पापाराझींनाही फटकारलं

VIDEO:वडिलांच्या मास्क उतरवण्यावर भडकली जान्हवी कपूर; पापाराझींनाही फटकारलं

जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) तरुणाईची आवडती अभिनेत्री आहे. रियल लाईफमध्ये ती खूप विनम्र आणि शांत आहे.

 • Share this:
  मुंबई,20 ऑक्टोबर- जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) तरुणाईची आवडती अभिनेत्री आहे. रियल लाईफमध्ये ती खूप विनम्र आणि शांत आहे. जान्हवी कपूर नुकतीच सुट्टीवर गेली होती. यावेळी तिने अनेक फोटोसुद्धा शेअर केले होते. मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवल्यानंतर जान्हवी आता मुंबईत परतली आहे. मंगळवारीती विमानतळावर वडील बोनी कपूरसोबत (Boney Kapoor) दिसली.आई श्रीदेवी यांनी हे जग सोडल्यानंतर जान्हवी आपल्या वडिलांची खूप काळजी घेते. अलीकडेच, पुन्हा एकदा असे दिसून आले की जेव्हा पापाराझीने फोटोसाठी बोनी कपूर यांना मास्क काढण्यास सांगितले आणि जेव्हा त्याने तसे केले तेव्हा मुलगी जान्हवीने वडिलांना फटकारले.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
  नेमकं काय घडलं- जान्हवी कपूर वडील बोनी कपूरवर खूप प्रेम करते. प्रत्येक मुलगी जितकी तिच्या वडिलांना फटकारू शकते तितकीच जान्हवी सुद्धा तिच्या वडिलांवर त्याच अधिकाराने चिडली होती. वास्तविक, जेव्हा विमानतळासारख्या सार्वजनिक ठिकाणी पापाराझींनी या दोघांना एकत्र पाहिलं, तेव्हा त्यांनी दोघांना फोटोसाठी मास्क काढण्यास सांगितलं. बोनी कपूर यांनी पापाराझींची विनंती स्वीकारली आणि त्यांनी मास्क काढण्यास सुरुवात केली.वडिलांना मास्क काढताना पाहून जान्हवी संतापते आणि स्वतःच्या हातांनी मास्क घालू लागते. फोटोग्राफर त्यांना सांगत असतो काहीही होणार नाही. हे ऐकल्यानंतर अभिनेत्री म्हणते, 'असा चुकीचा सल्ला देऊ नका.' यानंतर दोघेही मास्क घालून एकत्र पोज देताना दिसून आले.विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. (हे वाचा:शिल्पा-राजविरोधातील आरोप शर्लिनला महागात; कोर्टात 50 कोटींचा मानहानीचा खटल) टॅटू- कारमध्ये बसण्यापूर्वी एक फोटोग्राफर जान्हवीला तिच्या हातावरचा टॅटू दाखवण्यास सांगतो. यावर ती उत्तर देते, 'खूप बघितलंय मी ते इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे'. जान्हवी कपूरने या महिन्यातच तिच्या हातावर 'आय लव्ह यू माय लबू' टॅटू काढला आहे. तिने याआधी तिची आई श्रीदेवीची एक चिठ्ठी शेअर केली होती ज्यावर लिहिले होते 'आय लव्ह यू माय लबू, यू आर द बेस्ट बेबी'. जान्हवी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणापूर्वीच तिची आई श्रीदेवी यांचे निधन झाले होते. जान्हवीने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. यानंतर 'रुही' आणि 'गुंजन सक्सेना' या चित्रपटांमध्येही लोकांनी तिला पसंत केलं होतं. आगामी काळात ती 'गुडलक जेरी', 'तख्त', 'दोस्ताना 2' आणि 'रणभूमी' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: