मुंबई, 18 जून- विशाल भारद्वाज दिग्दर्शित रंगून सिनेमासाठी पहिल्यांदा कंगना रणौत आणि शाहिद कपूरने स्क्रीन शेअर केली होती. २०१७ मध्ये आलेला हा सिनेमा प्रेक्षकांना फारसा आवडला नव्हता. पण सिनेमातील शाहिद आणि कंगनाच्या किसिंग सीनची खूप चर्चा झाली होती. हा सीन देताना दोघंही चिखलात लोळत होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नुकतंच नेहा धुपियाच्या शोमध्ये शाहिदने या सिनेमातील किसिंग सीनबद्दल प्रश्न विचारला गेला. या किसिंग सीनमधील सर्वात वाईट हिस्सा कोणता होता या प्रश्नाचं उत्तर देताना शाहिद म्हणाला की, ‘हा कोणताही विचार न करता विचारला गेलेला प्रश्न आहे. या सीनबद्दल फारसं काही आठवत नाही. आता मी पूर्ण ब्लँक झालो आहे. ही सीन चिखलात होता तर keechad-y होता.’ हेही वाचा- …म्हणून तब्बल 16 वर्ष हा सुपरस्टार शाहरुख खानशी एक शब्दही बोलला नाही
हेही वाचा- VIDEO: Aamir Khan सोबत मुलगी इराने केलं असं काही की तो झोपू शकला नाही असं म्हटलं जातं की, कंगना आणि शाहिदमध्ये विस्तव जात नाही. याआधीही अनेक मुलाखतीदरम्यान कंगना म्हणाली होती की, ‘रंगून’च्या सेटवर शाहिदसोबत एकच कॉटेज शेअर करणं हे कोणत्याही वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. तसंच त्याच्यासोबत किसिंग सीन देणं हा सर्वात वाईट अनुभव होता. ‘रंगून’च्या सेटवर शाहिद आणि कंगना ऑनस्क्रीन जेवढे चांगले दिसत होते, तेवढेच ऑफस्क्रीन त्यांचं नातं वाईट होतं. दोघांमध्ये अनेक कारणांमुळे बाचाबाचीही झाली. शाहिदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २१ जूनला त्याचा कबीर सिंग हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा आडवाणीही आहे. सध्या बी- टाउनमध्ये दोघांच्या सिनेमातील किसिंग सीनची आणि त्यांच्या केमिस्ट्रीचीही चर्चा होताना दिसत आहे. कबीर सिंगमध्ये शाहिद नशेत धुंद असलेल्या डॉक्टरची भूमिका निभावताना दिसत आहे. २०१७ मध्ये आलेल्या तेलगू सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत रिमेक आहे. येत्या २१ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर या सिनेमात कबीर सिंग या मेडिकल विद्यार्थ्याची भूमिका साकारत आह. तर कियारा आडवाणी त्याची प्रेयसी दाखवण्यात आली आहे. कबीर हा फार रागीट स्वभावाचा असतो. पण त्याचं प्रितीवर (कियारा आडवाणी) अतोनात प्रेम असतं. पण अचानक प्रिती त्याच्या आयुष्यातून निघून जाते. हेही वाचा- भाच्याच्या बर्थडेमध्ये सलमान खानने केला स्टंट, हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच VIDEO : नवी मुंबईत शाळेजवळ आढळली बाँब सदृश वस्तू