मुंबई, 13 फेब्रुवारी- आयपीएल 2022 च्या लिलावाचा (IPL Auction 2022) पहिला दिवस शनिवारी पार पडला. यावेळी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shahrukh Khan son) आर्यन खान (Aryan Khan) आणि मुलगी (Daughter) सुहाना खान (Suhana Khan) यांनी 2022 च्या आयपीएल लिलावात त्यांच्या वडिलांची जागा घेतली. दरम्यान आदल्या दिवशी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जिथे ते कोलकाता नाईट रायडर्सच्या लिलावाच्या धोरणांवर चर्चा करताना दिसून आले होते. यादरम्यान अभिनेत्री जुही चावलाची (Juhi Chawalas Daughter) मुलगी जान्हवी मेहताही (Janhavi Mehta) त्यांच्यासोबत दिसली. जी सुहाना आणि आर्यनसोबत आयपीएल लिलावात सहभागी झाली होती. सुहाना आणि आर्यनबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण जुही चावलाची मुलगी लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहते. अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर जान्हवी मेहताचे फोटो व्हायरल झाले आहेत. ती आयपीएल 2022 मध्ये सहभागी झाली होती. यावेळी जान्हवी मेहता व्हाइट टॉप आणि ब्लॅक ब्लेझरमध्ये दिसली. वास्तविक, जुही चावला शाहरुख खानसोबत कोलकाता नाईट रायडर्सची सहमालक आहे. इतकंच नव्हे तर शाहरुख आणि जुहीची खूप घट्ट मैत्रीही आहे. दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. शाहरुख आणि जुहीप्रमाणेच त्यांच्या मुलांचं बाँडिंगही खूप छान आहे. अशा परिस्थितीत यावेळी शाहरुख आणि जुहीच्या मुलांनी कोलकाता नाईट रायडर्सच्या लिलावात भाग घेतला. जुही चावलाने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये तीन स्टारकिड्स एकत्र बसून लिलावावर चर्चा करताना दिसत आहेत. (हे वाचा:
IPL Auction मध्ये पहिल्यांदाच दिसली Suhana Khan, Aryan सह लावणार बोली
) जुही चावलाने 1995 मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केलं होतं. त्यांना जान्हवी मेहता आणि अर्जुन मेहता ही दोन मुलं आहेत. जुहीची दोन्ही मुलं लाइमलाइटपासून दूर राहतात. पण, आता हळूहळू जान्हवीचा पब्लिक अपिअरन्स वाढत आहे. गेल्या काही वर्षांत जान्हवी मेहताही आयपीएल लिलावादरम्यान दिसली होती. जान्हवीने परदेशातून शिक्षण घेतलं आहे. 2019 मध्येच तिनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तिला अभिनयात रस नाही. त्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.