मुंबई, 13 जुलै : अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा मित्रपरिवार, नातेवाइक, इतर कलाकार आणि चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय ते सर्व बरे व्हावेत यासाठी प्रार्थनाही केली आहेत. त्यांच्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात. अभिनेत्री जुही चावलानेदेखील (Juhi Chawla) बच्चन कुटुंबाबाबत ट्वीट केलं. मात्र एका चुकीमुळे ती ट्रोल झाली. त्यानंतर तिनं आपलं ट्वीट डिलीट करून नवं ट्वीट केलं आणि आता आपल्या जुन्या ट्वीटबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. बच्चन कुटुंबाबाबत ट्वीट करताना अभिनेत्री जुही चावलाने एक चूक केली आणि ही चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि ती ट्रोल होऊ लागलीत. जुहीने आराध्याऐवजी आयुर्वेदा असं लिहिलं होतं.
जुही चावलाने ट्वीट केलं, “अमितजी, अभिषेक आणि आयुर्वेदा लवकरच बरे होतील” ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुलीचं आराध्याचं नाव जुहीने आयुर्वेदा असं लिहिलं. एका ट्विटर युझरने याबाबत विचारलं त्यानंतर जुहीने हे ट्वीट डिलीट केलं आणि पुन्हा दुसरं ट्वीट केलं. ज्यामध्ये तिने आराध्या असं लिहिलं. मात्र आपण आपल्या जुन्या ट्वीटमध्ये चूक केली नव्हती असं ती म्हणाली.
Amitji, Abhishek, Aishwarya & Aaradhya... Our heartfelt best wishes for your speedy recovery 🙏 My earlier tweet was not a typo, I meant , when I wrote , Ayurveda , that with Nature's Grace , it will help to recover fast . 🙏😇🌿⭐️@SrBachchan @juniorbachchan
— Juhi Chawla Mehta (@iam_juhi) July 12, 2020
जुहीने ट्वीट करून सांगितलं की, “अमितजी, अभिषेक, ऐश्रवर्या आणि आराध्या यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी मी हृदयापासून प्रार्थना करते. माझ्या आधीच्या ट्वीटमध्ये कोणतीही टायपो चूक नव्हती. मी आयुर्वेदा लिहिलं, याचा अर्थ निसर्गाची कृपा. ज्यामुळे त्यांना लवकर बरं होण्यात मदत होईल” हे वाचा - ‘लवकर बरे व्हा’, ऐश्वर्याला कोरोना झाल्यानंतर अशी होती विवेकची पहिली प्रतिक्रिया शनिवारी रात्रीच बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे वाचा - अभिनेत्री रेखाच्या हातावर BMCने मारला होम क्वारंटाइनचा शिक्का अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्या यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.