अभिनेत्री रेखाच्या हातावर BMCने मारला होम क्वारंटाइनचा शिक्का

अभिनेत्री रेखाच्या हातावर BMCने मारला होम क्वारंटाइनचा शिक्का

11 जुलै रोजी अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांचा बंगला पालिकेने सील केला होता.

  • Share this:

मुंबई 13 जुलै: मुंबईत कोरोनाचं थैमान वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनाही कोरोनाने ग्रासलं आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यातल्या सेक्युरीटी गार्ड हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्यांचा बंगला सील करण्यात आला होता. रेखा यांना सध्यातरी कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला. आणि त्यांना घराच्याबाहेर न पडण्याची सूचना केली अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास त्यांची पुन्हा एकदा टेस्ट करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

बच्चन कुटुंबातल्या चार सदस्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बंगल्यावरच्या इतर स्टाफचीसुद्ध चाचणी करण्यात आली होती. ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यांना बंगल्यामध्येच क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्यांच्यात काही लक्षणे आढळल्यास पुन्हा एकदा टेस्ट करण्यात येईल अशी माहितीही पेडणेकर यांनी दिली.

11 जुलै रोजी अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांचा बंगला पालिकेने सील केला होता.

'दिल बेचारा'तील अभिनेत्रीसह रोमँटिक डान्स; सुशांत सिंह राजपूतचा Unseen Video

दरम्यान दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता अमिर खान यांच्यानंतर अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यांचा मुंबईतील बंगला पालिकेकडून सील करण्यात आला आहे. त्याशिवाय रेखा यांच्या बंगाल्याच्या बाहेर पालिकेने नोटीसही जारी केली आहे.

'लवकर बरे व्हा', ऐश्वर्याला कोरोना झाल्यानंतर अशी होती विवेकची पहिली प्रतिक्रिया

त्यांचा बंगला वांद्रे येथील बॅडस्टॅंड भागात आहे. त्यांच्या घराच्या सुरक्षेसाठी कायम 2 सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेकडून रेखा यांचा संपूर्ण बंगला सॅनिटाईझ करण्यात आला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 13, 2020, 5:16 PM IST
Tags: rekha

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading