जुग जुग जियो या कौटुंबिक कथानकाच्या धमाल सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली. वरून धवन, किआरा अडवानी, नीतू कपूर, अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा एका कुटुंबाची मजेदार कहाणी दाखवणारा होता. या सिनेमासाठी कलाकारांनी प्रमोशनवर सुद्धा बरीच मेहनत घेतली होती.
नीतू कपूर यांच्या कमबॅक सिनेमापासून प्राजक्ता कोळी या मराठमोळ्या युट्युबरचा पहिला बॉलिवूड सिनेमा पर्यंत कलाकारांसाठी हा सिनेमा बराच खास होता. या सिनेमातील सगळ्या स्टारकास्टचं पेमेंट मिळून साधरणतः चाळीस करोडच्या घरात गेल्याचं समोर येत आहे. सिनेमातल्या या बड्या कलाकारांनी सिनेमासाठी किती पैसे आकारले माहित आहे का?
या सिनेमाच्या टीममध्ये सर्वात जास्त चर्चित होत्या त्या म्हणजे अभिनेत्री नीतू कपूर. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर स्वतःला सावरून त्यांनी पुन्हा एकदा सिनेमा क्षेत्रात पाऊल ठेवलं. नीतू यांनी त्यांच्या कमबॅक सिनेमासाठी तब्बल 4 कोटी घेतल्याचं सांगितलं जात आहे.
या गटात सर्वात महागडे अभिनेते ठरले अनिल कपूर. अनिल कपूर यांनी या सिनेमासाठी सर्वाधिक म्हणजे 10 कोटी रुपये आकारल्याचं सांगितलं जात आहे.
तर अभिनेता वरुण धवनने केवळ सिनेमामध्ये प्रॉफिट शेअरिंगच्या आधारावर काम केलं आणि त्याने एकही रुपया आकाराला नाही असं सांगितलं जात आहे.