मुंबई, 21 मार्च: अभिनेता जॉन अब्राहमने खुलासा केला आहे की, गेल्या 17-18 वर्षांत त्याने केवळ तीन दिवसांची सुट्टी घेतली आहे. 'शेप ऑफ यू' (
Shilpa Shetty Shape of You) या फिटनेस शोमध्ये शिल्पा शेट्टीसोबतच्या संभाषणात जॉन अब्राहमने त्याच्या फिटनेसबाबत काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्याने असेही सांगितले की, सिगारेट पिण्यापेक्षा साखर जास्त हानिकारक आहे. जॉन म्हणतो की 17-18 वर्षांत त्याने फक्त तीन दिवसांची सुट्टी घेतली आहे. त्याने हे मान्य केले की ही बाब खूप कंटाळवाणी आहे. तो म्हणतो, 'मला म्हणायचे आहे की ही चांगली गोष्ट नाही, प्रत्येकाला ब्रेक हवाच असतो.'
शोमध्ये एका मजेदार 'ट्रू ऑर फॉल्स' या सेशनमध्ये, शिल्पा शेट्टीने सांगितले की जॉनने 25 वर्षांपासून त्याची आवडती मिठाई काजू कतली खाल्ली नाही आहे. जॉनने हसून उत्तर दिले, 'मला वाटते ते खोटे आहे. 27 वर्षांपासून हे असे आहे. हा एक मोठा काळ आहे.'
हे वाचा-काळविट शिकार प्रकरण : अभिनेता सलमान खान याला जोधपुर न्यायालयाचा दिलासा
जॉन स्वत:ला हँडसम मानत नाही
जॉनच्या फिटनेस, स्टाइल आणि लुकवर अनेक तरुणी फिदा आहेत. मात्र जॉनचं याविषयी वेगळं मत आहे. जॉनच्या लुकबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, 'मी कुठेतरी वाचले आहे की तू हँडसम आहेस यावर तुझा विश्वास नाही.' तेव्हा जॉन म्हणाला, 'हो. मला वाटते की ते खूप व्यक्तिनिष्ठ आहे. ही मनाची स्थिती आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला चांगले वाटत असेल तर तुम्हाला छान वाटते. पण, कुणीही जगासाठी हँडसम किंवा जगासाठी सुंदर असू शकतो यावर माझा विश्वास नाही. ते प्रत्येकावर अवलंबून आहे. आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपण सर्वजण असुरक्षितता नावाच्या स्ट्रींगने बांधलेले आहोत. आता मी एका स्टेजवर पोहोचलो आहे आणि तुम्हीही पोहोचल्या आहात, जिथे मी बाहेरून कसा दिसतो हे महत्त्वाचे नाही. पण आतून आपल्याला कसे वाटते हे जास्त महत्त्वाचे आहे.'
हे वाचा-'RRR' मधील डान्स पाहून आमिरला फुटला घाम; म्हणाला,आपणास न्हाय जमणार!
जॉनने अशी देखील माहिती दिली की, त्याच्या फोनमध्ये कोणतेही सोशल मीडिया App नाही आहे. तो WhatsApp देखील वापरत नाही. त्याने सांगितले लवकरच तो सोशल मीडियावरुन दूर जाणार आहे.
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर जॉन अब्राहमने अलीकडेच मोहित सूरीचा अपकमिंग सिनेमा 'एक व्हिलन रिटर्न्स'चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तारा सुतारिया, दिशा पटानी आणि अर्जुन कपूर यांच्याही भूमिका आहेत. तो लवकरच अॅक्शन मुव्ही 'अटॅक'मध्ये दिसणार आहे. लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही भूमिका आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.