मुंबई, 16 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम ला स्पोर्ट्स बाईक्सचं प्रचंड वेड आहे हे त्याच्या चाहत्यांना नक्कीच माहिती असेल. अभिनेत्याकडे अनेक बाईक्ससुद्धा आहेत. बाईक्सबाबतची त्याची आवड मोठ्या पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यातसुद्धा दिसून येते. त्याच्याकडे आधीच अनेक सुपरबाइक आणि क्रूझर्सचे कलेक्शन आहे. जॉन अब्राहम अलीकडेच बॉलिवूडच्या नवीन ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘पठाण’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला होता.जॉन अब्राहमने नुकतीच एक नवीन सुझुकी हायाबुसा बाइक खरेदी केली आहे. ही एक अतिशय मस्त दिसणारी प्रीमियम स्पोर्ट्स बाइक आहे. जॉन अब्राहमच्या ‘धूम’ चित्रपटानंतर सुझुकी हायाबुसा भारतीय बाजारपेठेतील एक लोकप्रिय नाव बनलं आहे. या चित्रपटाबाबत बोलताना असं म्हटलं जातं की, जॉनने यामध्ये स्वत:ची बाईक चालवली होती. जॉन अब्राहमकडे नेहमी त्याच्या गॅरेजमध्ये धूम बाईक म्हणून ओळखली जाणारी सुझुकी हायाबुसा असायची. ही त्याची आवडती बाईक आहे. तो नेहमीच नवीन मॉडेल्ससह त्यांचं कलेक्शन अपडेट करत राहतो. 2023 मध्ये आलेले नवीन मॉडेलही आता त्याने विकत घेतलं आहे. हायाबुसाचं घरी स्वागत करतानाचा जॉनचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (हे वाचा: ‘त्या’ बाबतीत Mc Stan ने Virat kohali ला टाकलं मागे; सोशल मीडियावर रंगली चर्चा ) बाईक्सचा वेग- 2023 Suzuki Hayabusa मध्ये 1340cc इनलाइन-फोर-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 187 bhp पॉवर आणि 150 Nm टॉर्क निर्माण करते. ही बाईक 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, 3 पॉवर मोड आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्येदेखील यामध्ये उपलब्ध आहेत. दमदार Hayabusa ची किंमत सध्या भारतात 16.41 लाख रुपयांपासून सुरू होते. या बाईकचा वेग ताशी 300 किमी इतका आहे.
बाईक्सचे फीचर्स- बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात अॅल्युमिनियम सस्पेन्शन फ्रेम, शोवा सस्पेन्शन कंम्पोनन्ट्स, ब्रेम्बो स्टाइलमा ब्रेक कॅलिपर्स आणि ब्रिजस्टोन बॅटलॅक्स S22 टायर्स आहेत. सुपरबाईकमध्ये हिल होल्ड कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस आणि टीएफटी डिस्प्ले यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये देखील आहेत.
जॉन अब्राहमचं बाईक कलेक्शन- हायाबुसा व्यतिरिक्त, अभिनेत्याकडे इतरही डझनभर बाईक्स आहेत. त्याच्या बाईक कलेक्शनमध्ये यामाहा आर1, कवासाकी ZX-14R, होंडा CBR 1000RR-R, डुकाटी , सुझुकी GSX-1000R, बीएमडब्ल्यू S100RR सारख्या अनेक प्रीमियम बाइक्स आहेत. याशिवाय जॉनकडे यामाहा आरडी ३५०, यामाहा व्ही-मॅक्स, एमव्ही अगस्टा एफ३८००, एप्रिलिया आरएसव्ही४ आरएफ आणि डुकाटी पानिगेल व्ही४ या काही अनोख्या बाईक्सही आहेत