'बिग बॉस' सोळाचा विजेता कोण ठरणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. चाहत्यांचा बऱ्यापैकी कल शिव ठाकरे आणि प्रियांका चहर चौधरीकडे असल्याचं दिसून येत होतं.
त्यामुळे या दोघांपैकी एक विजेता ठरेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र अखेर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने विजेते पदावर नाव कोरत सर्वांनाच धक्का दिला आहे.
बऱ्याचवेळा स्टॅनच्या फॅनफॉलोईंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र ट्रॉफी आपल्या नावावर करत एमसीने पुन्हा एकदा आपली प्रसिद्धी सिद्ध केली आहे.
दरम्यान आता एमसी स्टॅन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका बाबतीत एमसीने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.
विराट कोहली आणि एमसी स्टॅनने एकाच वेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. विराट इंस्टाग्रामवर भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे.
परंतु एकाच वेळी टाकलेल्या त्या पोस्टवर विराटला २० लाख लाईक्स होते तर एमसी स्टॅनला ६० लाख लाईक्स होते. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.