मुंबई, 3 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच चिंता वाढवणाऱ्या बातम्यादेखील समोर येत आहेत. अशातच बी टाऊनमध्येही कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीज कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. दरम्यान, आता बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. जॉन अब्राहमने सोमवारी सकाळी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. त्याने स्टोरीमध्ये ‘तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीच्या संपर्कात होतो, ज्याला नंतर कळले की त्याला कोविड आहे. प्रिया आणि मी कोविड पॉझिटिव्ह आलो आहोत.’ तसेच, आम्ही स्वतःला घरी क्वारंटाइन केले असून आता आम्ही कोणाच्या संपर्कात नाही. आमचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. आम्हाला सौम्य लक्षणे आढळली आहेत. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी रहा. मास्क जरूर घाला. असे आवाहनदेखील त्याने केले आहे. जॉन गेल्या वर्षी दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसला मात्र त्याचे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ‘मुंबई सागा’मध्ये काम केले आणि या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘सत्यमेव जयते 2’मध्ये दिसला. या वर्षीही त्याचे अनेक चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘अटॅक’ ज्याची रिलीज डेट 28 फेब्रुवारी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.