मुंबई, 04 जुलै: दुसरीकडे स्वप्नं फक्त बघितली की ती पूर्ण होत नाहीत तर त्या दिशेने अखंड प्रयत्न करत राहिले तरच ती प्रत्यक्षात येतात. मग त्याच्या आड जात-पात,धर्म, परिस्थिती असे कोणतेही अडसर येत नाहीत. या वेळच्या फेमिना मिस इंडियाच्या (Femina Miss India ) ग्रॅंड फायनल राऊंडमध्ये पोहोचलेल्या रिया टिर्की (Finalist Riya Tirki) हिच्याकडे बघितल्यावर हेच स्पष्ट होतं. फेमिना मिस इंडियाच्या फायनल राउंडमध्ये पोहोचलेली रिया ही आदिवासी समाजातील पहिली तरुणी ठरली आहे (First Tribal Girl To Reach In Final Round Of Miss India). ती 24 वर्षांची आहे. रिया टिर्कीला मिस इंडियाचा किताब नाही मिळू शकला; पण तिनं अनेकांची मनं मात्र जिंकली. तर कर्नाटकची सिनी शेट्टीही यंदाची फेमिना मिस इंडिया ठरली आहे. 31 सौंदर्यवतींना मागे टाकत सिनीने मिस इंडिया होण्याचा मान पटकवला.
मूळच्या झारखंडच्या रियाचं ( Jharkhand Girl Riya ) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांच्यासह अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे. ‘ही झारखंडसाठी अभिमानाची गोष्ट आहे,’ असं सोरेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. स्पर्धेपूर्वी रियाला संपूर्ण झारखंडकडून सोरेन यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. रियानं झारखंडमधील रांचीच्या विवेकानंद विद्या मंदिरमधून शिक्षण पूर्ण केलं आहे.आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथल्या पी. बी. सिध्दार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या कॉलेजमधून तिनं पदवी घेतली. ती एक मॉडेलही आहे.
हेही वाचा - Sonalee Kulkarni: लंडनच्या टाऊन ब्रिजवर अप्सरांनी केलं सिनेमाचं कलरफुल प्रमोशन, पाहा Video
या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रियानं आपल्या व्यक्तिमत्वात तिनं अनेक बदल केले. प्रशिक्षणादरम्यान तिनं जनरल नॉलेज (General Knoweldge) आणि संवादकौशल्यावर (Communication Skill) जास्त भर दिला. बॉडी फिटनेसकडेही विशेष लक्ष दिलं. 2015 पासून ती या स्पर्धेची तयारी करत होती. जवळपास 8 वर्ष अखंड प्रयत्न केल्यानंतर ती या ठिकाणी पोहोचली आहे. रिया या स्पर्धेत येण्यापूर्वी मिस विजयवाडा आणि मिस अमरावती या स्पर्धांचीमध्येही फायनल राउंडपर्यंत पोहोचली होती. त्याशिवाय तिनं बॉम्बे फॅशन वीकमध्ये रँप वॉकही केलं होतं.
“फायनलिस्ट म्हणून माझी निवड झाली तेव्हा माझं स्वप्नं प्रत्यक्षात उतरलं असं मला वाटलं. तुम्हाला केवळ एक संधी मिळाली आणि तुम्ही त्या संधीचं सोनं केलंत तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो हे मला मिळालेल्या यशावरून तुम्हाला पटेल. संपूर्ण भारतातील आदिवासींच्या विकासासाठी मला काम करायचं आहे आणि देश बळकट होण्यासाठी काम करायचं आहे,” असं रियानं नवभारत टाइम्सशी बोलताना सांगितलं.
हेही वाचा - 'एवढा खराब ड्रेस कोणी कसं काय घालू शकतं'; सी-थ्रू गाऊनमुळे मलायका अरोरा ट्रोल
तिचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. “2000 साली बिहारमधून झारखंड वेगळं राज्य म्हणून अस्तित्वात आलं. झारखंडला आदिवासींचीभूमी म्हणून ओळखलं जातं; पण अजूनही झारखंडमधल्या आदिवासींना विकासासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी अत्यंत संघर्ष करावा लागत आहे,”असं रिया सांगते.
“मी आदिवासी असल्यामुळे मला शाळेत प्रवेश मिळायलाही अडचणी आल्या होत्या. पण याचमुळे काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द माझ्या मनात निर्माण झाली. या स्पर्धेत झारखंडची प्रतिनिधित्व करणारी पहिली आदिवासी मुलगी असणं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि माझ्या समुदायासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” अशी प्रतिक्रिया टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना रियानं व्यक्त केली.
एक यशस्वी उद्योजक होण्याचं रियाचं स्वप्नं आहे आणि तिला आपल्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी काम करायचं आहे. रिया पर्यावरणपूरक जीवनशैलीची ती पुरस्कर्ती आहे तसंच धोक्यात असणाऱ्या दुर्मिळ प्रजातीच्या प्राण्यांसाठी ती काम करते. अर्थातच रियाचं हे यश अगदी वेगळं, उल्लेखनीय आहे आणि त्यामुळेच तिच्यावर सगळीकडूनच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Miss india