मुंबई, 12 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे सुखी आणि आनंदी जीवन जगत आहेत. त्यांना एक मुलगीदेखील आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ऐश्वर्याशी लग्न होण्यापूर्वी अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिष्मा कपूर या दोघांचं प्रेमप्रकरण चांगलंच गाजलं होतं. ते लग्नही करणार होते. त्यावेळी या दोघांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता होती. पण अभिषेक व करिष्माच लग्न झालं नाही. हे लग्न का झालं नाही, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र, आता यामागील विविध कारणं समोर येऊ लागलीत.
बॉलीवूड अभिनेत्री करिष्मा कपूर ही 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. करिष्मानं अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु अनेकदा व्यावसायिक आयुष्यापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तुम्हाला माहिती आहे का, करिष्माच लग्न एकेकाळी अभिषेक बच्चनसोबत होणार होतं. दोघांनीही मोठ्या धूमधडाक्यात साखरपुडा केला. पण नंतर असं काही घडलं, ज्यानंतर दोघांचं एकमेकांशी लग्न झालं नाही. पुढे करिष्मानं बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं, पण हे लग्न केवळ 13 वर्षे टिकलं आणि दोघांचा घटस्फोट झाला.
म्हणून अभिषेक-करिष्माचं लग्न मोडलं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक-करिष्माचं लग्न मोडण्याचं एक कारण करिष्माची आई आहे. कारण या दोघांच्या लग्नाआधी करिष्माच्या आईनं बच्चन कुटुंबासमोर, अमिताभ बच्चन यांनी संपत्तीतील काही हिस्सा अभिषेकच्या नावावर करावा, त्यानंतरच लग्न होईल, अशी अट ठेवली होती. ही अट बच्चन कुटुंबाने मान्य केली नाही. त्यामुळे हे लग्न होऊ शकलं नाही.
लग्न मोडण्यास जया बच्चनसुद्धा कारणीभूत?
अभिषेक आणि करिष्मा या दोघांच लग्न न होण्यामागे अभिषेकची आई अभिनेत्री जया बच्चनसुद्धा कारणीभूत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. करिष्माला घरची सून बनवण्यापूर्वी अभिषेकची आई जया बच्चन यांनी एक अट ठेवली होती, त्यानंतर हे नातं तुटलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिष्मानं लग्नानंतर चित्रपटात काम करणं बंद करावं, अशी जया बच्नन यांची इच्छा होती. मात्र, तेव्हा करिष्मा त्या काळातील टॉप स्टार्सपैकी एक होती. जया बच्चनची ही अट तिला मान्य नव्हती, आणि त्यामुळे हे नातं तुटलं. तेव्हा जर करिष्मानं ही अट मान्य केली असती, तर ती आज अभिषेकची पत्नी असती; पण तसं झालं नाही.
दरम्यान, अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर यांच्या रिलेशनशिपची एकेकाळी बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा होत होती. जेव्हा या दोघांचं रिलेशन तुटलं तेव्हा त्यामागील नेमकं कारण समोर आलं नव्हतं. पण आता मीडिया रिपोर्ट्समध्ये ही कारणं समोर आली असून, त्यावरून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Abhishek Bachchan, Bollywood, Entertainment