मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Birthday Special: जाणून घ्या Javed Akhtar यांची Love Life; पहिल्या पत्नीला घटस्फोट देत केलं होतं दुसरं लग्न

Birthday Special: जाणून घ्या Javed Akhtar यांची Love Life; पहिल्या पत्नीला घटस्फोट देत केलं होतं दुसरं लग्न

Javed Akhtar Birthday Special

Javed Akhtar Birthday Special

बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी झाला होता. यावर्षी जावेद अख्तर आपला 77 वा वाढदिवस साजरा (Javed Akhtar Birthday Special)करीत आहेत.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 17 जानेवारी: बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी झाला होता. यावर्षी जावेद अख्तर आपला 77 वा वाढदिवस साजरा (Javed Akhtar Birthday Special)करीत आहेत. जावेद अख्तर हे बर्‍याचदा हेडलाईन्सचा एक भाग बनले आहेत. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते बर्‍याचदा चर्चेत राहिले आहे. यासोबतच जावेद यांची खासगी लाईफही अनेकवेळा चर्चेत राहिली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्याशी त्यांची झालेली पहिली भेट

बॉलीवूडच्या दुनियेत अशा अनेक जोड्या आहेत ज्यांचे प्रेम दीर्घकाळ टिकले नाही तर काहींचा लग्नानंतर घटस्फोट झाला. मात्र काही अशा जोड्यादेखील आहेत.ज्यांनी आयुष्याचा एकत्र खूप मोठा पल्ला गाठला. शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांची जोडी अशांपैकीच एक आहे. दोघांच्या लग्नाला आज 37 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जावेद अख्तर यांनी बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीशी लग्न केले आहे. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. जावेद अख्तर शबानाला त्यांच्या वडिलांच्या घरी भेटले. जावेद अनेकदा कैफी आझमी यांना कवितांसाठी भेटायला जात असे. अशा प्रकारे हळू हळू दोघे एकमेकांशी बोलू लागले. ही गोष्ट प्रेमात कधी बदलली हे कोणालाही कळले नाही.

शबानाची आई कैफी आझमींची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलीचे विवाह विवाहित पुरुषाशी व्हावे. पण शबाना जावेदच्या प्रेमात पडली होती आणि तिने आई आणि वडिलांकडे विनवणी केली. त्यानंतर 1978 मध्ये जावेदने आपली पहिली पत्नी हनी इराणीशी घटस्फोट घेतला.

शबानासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता. ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या सेटवर हनी आणि जावेद यांची ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हनीशी घटस्फोट घेतल्यानंतर जावेद आणि शबाना यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या रिलेशनला नाव दिले आणि 1984 मध्ये दोघांनी मुस्लिम रीति-रिवाजांनी लग्न केले. मात्र, या लग्नापासून शबानाला मुले नाहीत. जावेद अख्तर यांना 1999 मध्ये पद्मश्री, 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय जावेद अख्तर यांना 8 वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Shabana Azami