जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Janhavi Kapoor: जान्हवी कपूरच्या वडिलांना होती 'ही' वाईट सवय; अभिनेत्री केला मोठा खुलासा

Janhavi Kapoor: जान्हवी कपूरच्या वडिलांना होती 'ही' वाईट सवय; अभिनेत्री केला मोठा खुलासा

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर

बॉलिवूडची दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर धुमाकूळ माजवत आहे. जान्हवीने फारच कमी वेळेत इंडस्ट्रीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑक्टोबर-  बॉलिवूडची दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर धुमाकूळ माजवत आहे. जान्हवीने फारच कमी वेळेत इंडस्ट्रीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. एक स्टारकिड् असूनही जान्हवी कपूरने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवीची जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. तिला सोशल मीडियावरदेखील बरीच पसंती मिळत असते. जान्हवी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी आपलं व्यावसायिक आयुष्य तर कधी आपल्या खाजगी आयुष्यामुळे जान्हवी सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या आगामी ‘मिली’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे.जान्हवी आपल्या आईच्या खूप जवळ होती. श्रीदेवी या जगातून गेल्यानंतरही ती आपल्या आईचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. लवकरच जान्हवी कपूर आपल्या आगामी ‘मिली’ चित्रपटात आपला अप्रतिम अभिनय दाखवताना दिसणार आहे. सध्या ही अभिनेत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच, जान्हवीने पिंकविलाशी संवाद साधला होता. या संवादादरम्यान अभिनेत्रीने वडील बोनी कपूर यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यामुळे तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील खूप त्रस्त झाल्या होत्या. जान्हवी कपूर नेहमीच मीडियाशी मनसोक्त संवाद साधताना दिसून येते. ती सतत आपल्या मुलाखतींमध्ये आपल्या आई-बाबांबाबत विविध गोष्टी शेअर करत असते. श्रीदेवी या जगातून गेल्यानंतर बोनी कपूर यांनी आई आणि वडील दोघांची जबाबदारी उचलली आहे. सध्या जान्हवी आणि ख़ुशी आपल्या वडिलांच्या फार जवळ आहेत. त्यांचं बॉन्डिंग फारच छान आहे. सतत त्या आपल्या वडिलांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. दरम्यान जान्हवीने नेमका काय खुलासा केला आहे, त्यावर एक नजर टाकूया. **(हे वाचा:** दिवाळी पार्टीत अजयच्या लेकीला पाहून लोकांना आठवली जान्हवी; काय आहे नेमकं प्रकरण? ) जान्हवी कपूरने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं की, माझ्या वडिलांना सिगारेट ओढण्याची खूप आवड होती. आणि ही सवय सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. वडिलांची ही सवय सोडवण्यासाठी त्यांनी विविध प्रयोगदेखील करुन पहिले. जसे की कधी त्यांची सिगारेट कापणे किंवा कधी सिगारेट बॉक्समध्ये टूथपेस्ट टाकणे अशा अतरंगी गोष्टी त्यांनी केल्या होत्या. पण जान्हवीने इतके प्रयत्न करुनही वडिलांची ही सवय सुटली नाही. जान्हवी म्हणते की माझी आईदेखील या सवयीमुळे खूप नाराज होती. पण शेवटी वडिलांनी ही सवय सोडली. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, चार-पाच वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी ही सवय सोडली होती.आता सिगारेटपासून दूर राहतात. जान्हवी कपूर पहिल्यांदाच ‘मिली’ चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या वडिलांसोबत काम करणार आहे. जान्हवी कपूरचा हा चित्रपट ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जान्हवीचा हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशाप्रेकारे पहिल्यांदाच बाप-लेकी एकत्र असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला होता. हा ट्रेलर अगदी थरकाप उडविणारा होता. ट्रेलर सर्वजण जान्हवीच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. फक्त चाहतेच नव्हे तर सेलेब्रेटींनी जान्हवी कपूरचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरने हा ट्रेलर शेअर करत जान्हवीचं कौतुक केलं होतं.. आता हा चित्रपट रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर काय कमल दाखवतो पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात