मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तमिळ चित्रपटाला जान्हवीचा नकार; हा अभिनेता ठरला वादाचं कारण

तमिळ चित्रपटाला जान्हवीचा नकार; हा अभिनेता ठरला वादाचं कारण

पहिल्याच चित्रपटातून जान्हवी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल धडकपूर्वी तिला महेश बाबूसोबत (Mahesh Babu) काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु तिनं त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 6 मार्च: जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं 2018 मध्ये ‘धडक’ (Dhadak) या चित्रपटातून बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. हा ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. सैराट प्रमाणेच या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. परिणामी पहिल्याच चित्रपटातून जान्हवी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल धडकपूर्वी तिला महेश बाबूसोबत (Mahesh Babu) काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु तिनं त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.

महेश बाबू हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या जबरदस्त अभिनय शैलीनं प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या महेश बाबूच्या प्रत्येक चित्रपटाला कोट्यवधींची ओपनिंग मिळते. परंतु इतक्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करण्यास जान्हवीनं नकार दिला होता.

अवश्य पाहा - जान्हवीचा पहिलाच आयटम साँग पाहून प्रेक्षक झाले अवाक; तुम्हाला कसा वाटतोय पाहा

जान्हवी आणि महेश बाबूच्या वयामध्ये बरंच अंतर आहे. अन् त्यामुळं रुपेरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री उत्तम दिसेल का? याबाबत तिच्या मनात शंका होती. त्यामुळं तिनं वयाचं कारण सांगून नकार दिला. दरम्यान तिला धडकमध्ये काम करण्याची ऑफर मिळाली. शिवाय तिच्या वयाच्या अनुरुप असलेल्या अभिनेत्यासोबतच तिला काम करायचं होतं. त्यामुळं तिनं धडकमध्ये काम करण्यास होकार दिला.

‘धडक’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली होती. त्यामुळं काही जाणांनी जान्हवीवर घराणेशाहीचे देखील आरोप केले होते. परंतु त्याही स्थितीत चित्रपटानं जवळपास 150 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. त्यानंतर जान्हवीनं ‘घोस्ट स्टोरीज’, ‘अंग्रेजी मिडियम’, ‘गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल’ या चित्रपटांमध्ये काम केलं. येत्या काळात ती ‘रुही’ या चित्रपटात झळकणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Janhvi kapoor, Mahesh babu, Movie shooting