• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • जान्हवी कपूरनं बोनी कपूर यांना फोटोग्राफर्ससमोरच खडसावलं! काय कारण होतं, पाहा Video

जान्हवी कपूरनं बोनी कपूर यांना फोटोग्राफर्ससमोरच खडसावलं! काय कारण होतं, पाहा Video

नुकतच Boney Kapoor आणि Janhavi kapoor यांना एकत्र एअरपोर्ट वर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी फोटोग्राफर च्या नजरा पडताच बोनी कपूर यांना मास्क खाली ( Boney kapoor mask off ) करायला सांगितलं, त्यावेळी जान्हवी कपूरनं त्याना चांगलच खडसावलं.

 • Share this:
  मुंबई, 20 ऑक्टोबर : अलीकडची बॉलिवूडची एक फेमस  ' बाप - बेटी जोडी ' म्हणजे Boney Kapoor आणि Janhavi kapoor या दोघांना मुंबईतील एअरपोर्टवर नुकतंच स्पॉट करण्यात आलं होतं. बोनी कपूर आपल्या दोन्ही मुलींना खूप प्रेम करतात. आई श्रीदेवीच्या जाण्यानं या दोघांना सर्वात मोठा आधार हा त्यांच्या वडिलांचा आहे. बऱ्याचदा जान्हवी कपूर, खुशी कपूर आणि वडील बोनी कपूर यांच्यासोबतचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवी कपूर आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर खूप प्रेम करते, याशिवाय तिचं आपल्या वडिलांवर जरा जास्तच प्रेम आहे. पण एअरपोर्टवर फोटोग्राफर्सनी गराडा घातलेला असताना मात्र असं काय झालं की, फोटोग्राफरसमोरच जान्हवीनं तिच्या वडिलांना चांगलंच खडसावलं.

  Aryan Khan Case: आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला

  अलीकडेच Janhavi kapoor चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. तिचा हा व्हिडिओ तिच्या वडिलांसोबतचा आहे. एअरपोर्टच्या बाहेर जान्हवी आणि बोनी कपूर दिसताच फोटोग्राफर्स आणि चाहत्यांचा गराडा पडला. सर्व फोटोग्राफरनी फोटो काढण्यासाठी Boney Kapoor यांना मास्क खाली करण्यात सांगितलं, पण त्याच वेळी जान्हवी कपूरनं त्यांना ' नही नही पापा मास्क नीचे मत करो' असं बोलून चांगलंच सुनावलं. लेकीचं ऐकून बोनी कपूरनेही मास्क खाली करण्यास नकार दिला. तरीही फोटोग्राफर्सचा आग्रह सुरू होता, इतकं काही होत नाही, काही सेकंदासाठी करा तुम्ही मास्क खाली. त्यावर जान्हवी भडकली आणि फोटोग्राफर्सनाही तिने सुनावलं.'उन्हे गलत सलाह मत दो' असं बोलून दोघे तेथून निघून गेले.
  दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर ( janhavi kapoor says her Daddy no no don't Mask off at airport video Viral ) खूप जास्त व्हायरल होतोय. तिचं त्यांना असं बोलण्यामागचा उद्देश चांगलाच होता. त्यामुळे तिचं वडिलांची काळजी घेते, म्हणून कौतुकच होत आहे. आताच्या दिवसात मास्क घालणं खूप महत्त्वाचं आहे, आणि गर्दीत शक्यता मास्क घालून राहावे. शिवाय आई (Sridevi )श्रीदेवी नंतर तिच्याकडे वडिलांशिवाय मोठी भिंत नाही. एकप्रकारे काळजी पोटी तिनं असं त्यांना म्हटलं आहे.

  '..तेव्हा 2च रुपयांचा पास माझ्या खिशाला परवडत होता';अमिताभ यांना आठवले ते दिवस

  जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या गुड लक जैरी आणि दोस्ताना 2 साठीच्या चित्रपटांच्या तयारीत आहे. त्यातील गुडलक जैरी हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज झालेल्या पाश्चिमात्य सिनेमा Kolamavu Kokila याचा रिमेक आहे. सर्वच चित्रपटात ती तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांवर जादू करते.
  First published: