जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Jacqueline Fernandez चं चाहत्यांना मोठं सरप्राईज; शेअर केलं आगामी हॉलिवूड सिनेमाचं पोस्टर

Jacqueline Fernandez चं चाहत्यांना मोठं सरप्राईज; शेअर केलं आगामी हॉलिवूड सिनेमाचं पोस्टर

Jacqueline Fernandez चं चाहत्यांना मोठं सरप्राईज; शेअर केलं आगामी हॉलिवूड सिनेमाचं पोस्टर

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez latest news) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी जॅकलीन एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै : बाॅलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) गणना केली जाते. बाॅलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez instagram) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. जॅकलीननं अभिनयाच्या जोरावर आणि आपल्या खास शैलीनं चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. जॅकलीन तिच्या हटके स्टाईल, अनोख्या अंदाजामुळे प्रसिद्धी झोतात असते. तरुणाईमध्ये जॅकलीनची खूप क्रेझ आहे. अशातच जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez latest news) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी जॅकलीन एका खास कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. जॅकलीन फर्नांडिस लवकरच हाॅलिवूडमध्ये (Jacqueline Fernandez hollywood debut)पदार्पण करणार आहे. ‘टेल इट लाइक अ वुमन’ या हाॅलिवूड(Tell it like a women hollywood movie)) चित्रपटातून जॅकलीन हाॅलिवूडमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत जॅकलीननं चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. पोस्टर शेअर केल्यापासून सगळीकडे जॅकलीनचीच चर्चा होतेय. चित्रपटाच्या पोस्टरवर जॅकलिनसह मार्गेरिटा बाय, इव्हा लॉन्गोरिया, कारा डेलेव्हिंग्ने, अॅनी वातानाबे, जेनिफर हडसन आणि मार्सिया गे हार्डन ही दिसत आहेत. हेही वाचा -  प्रेग्नेंट असूनही आलिया भट्टनं पूर्ण केलं ‘Heart of stone’चं शूटिंग, पोस्ट शेअर करत रणबीरला म्हणाली… पोस्ट शेअर करत जॅकलिननं म्हटलं की, हा एक अॅंथॉलॉजी चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन जगातील विविध भागांतील 8 महिला चित्रपट निर्मात्यांनी केले आहे. या काव्यसंग्रहात विविध शैलीतील अनेक कथा असतील. कॉमेडी-ड्रामा आणि अॅनिमेशनवर आधारित शॉर्ट फिल्म्स असतील. या चित्रपटातील संपूर्ण टीमचं जॅकलीननं आभार व्यक्त केले आहेत.

जाहिरात

‘टेल इट लाइक अ वुमन’ या हाॅलिवूड चित्रपटाचं शूटिंग अमेरिका, भारत आणि इटलीमध्ये झालं आहे. जॅकलीनला नव्या अवतारात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. जॅकलीननं शेअर केलेल्या पोस्टरवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा पाऊस करताना पहायला मिळत आहे. दरम्यान, जॅकलीन लवकरच बाॅलिवूडमधील ‘राम सेतू’ आणि ‘सर्कस’ या चित्रपटांत दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात