Home /News /entertainment /

Bollywood News: अखेर जॅकी श्रॉफच्या लेकीचीही सिनेसृष्टीत एन्ट्री; बघा व्हिडिओ

Bollywood News: अखेर जॅकी श्रॉफच्या लेकीचीही सिनेसृष्टीत एन्ट्री; बघा व्हिडिओ

काही दिवसांपूर्वीच कृष्णाने आपण चाहत्यांना एक सरप्राइज देणार असल्याचं म्हटलं होत. तर आता ते सरप्राइज समोर आलं आहे.

   मुंबई 2 जुलै: बॉलीवूड (Bollywood) अभिनेते जॅकी श्रॉफ (Jacky Shroff) यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफची (Tiger Shroff) बहीण देखील सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. कृष्णा (Krushna Shroff) देखील त्याच्या प्रमाणेच फिटनेस फ्रीक आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच तिची मोठी फॅनफॉलोइंग ही आहे.  तर आता तिने ही सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कृष्णाने आपण चाहत्यांना एक सरप्राइज देणार असल्याचं म्हटलं होत. तर आता ते सरप्राइज समोर आलं आहे. तिने एका म्यूझिक व्हिडिओतून (Krishna Shroff music video) पदार्पण केलं आहे.
  ‘कीनी किनी वारी’ (Kinni Kinni Wari) असं या अल्बम च नावं आहे. सोशल मीडिया वर या व्हिडिओ ला चांगला प्रतिसादही मिळत आहे. कृष्णा देखील यात अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. कृष्णा सोबत यात जन्नत जुबेर, नगमा, राज शुकर आणि तन्वी हे देखील आहेत.

  समांतर-2 मध्ये स्वप्नील-तेजस्विनी झाले 'इंटिमेट'; बोल्ड केमिस्ट्री चर्चेत

  व्हिडिओत कृष्णा बॉस लेडी अवतारात दिसत आहे. व्हिडिओत वूमनवूड सेलिब्रेट केलं जात आहे. टायगरच्या बहिणीचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री दिशा पाटणी देखील फारच खूश झालेली दिसत आहे. तिने यावर वोह किलिंग इट किशू असं म्हटलं आहे.
  हे गाणं गायिका राशी सूदने (Rashi Sood) गायलं आहे. तर लिरिक्स दिलजित मावी ने दिले आहेत. कृष्णा ने सोशल मीडियावर याची माहिती दिली होती. सोशल मीडिया वर कृष्णा चे फोटो फारच व्हायरल होत असतात. तिचे वर्कआऊट व्हिडिओ आणि फोटोज नेहमीच हीट ठरतात.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Actress, Bollywood, Daughter, Entertainment, Jackie shroff, Star celebraties, Tiger Shroff

  पुढील बातम्या