मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OTT Rules 2021: सरसकट कुणालाही नाही पाहता येणार Adult Content, केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

OTT Rules 2021: सरसकट कुणालाही नाही पाहता येणार Adult Content, केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर

मोबाईलवर वेगवेगळ्या OTT Platform वरून 18 वर्षांखालील व्यक्तींना हवा तो कंटेण्ट, VIDEO आता पाहता येणार नाहीत.  याबाबत केंद्र सरकारने आता नवीन नियमावली जाहीर केली आहे.

मोबाईलवर वेगवेगळ्या OTT Platform वरून 18 वर्षांखालील व्यक्तींना हवा तो कंटेण्ट, VIDEO आता पाहता येणार नाहीत. याबाबत केंद्र सरकारने आता नवीन नियमावली जाहीर केली आहे.

मोबाईलवर वेगवेगळ्या OTT Platform वरून 18 वर्षांखालील व्यक्तींना हवा तो कंटेण्ट, VIDEO आता पाहता येणार नाहीत. याबाबत केंद्र सरकारने आता नवीन नियमावली जाहीर केली आहे.

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी: केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी काही नवीन नियम आता लागू केले आहेत. इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी (Guidelines for Intermediaries and Digital Media Ethics Code) रूल्स, 2021 च्या अंतर्गत आता OTT प्लॅटफॉर्मसला त्यांचा कंटेट हा कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि कोणत्या वयोगटाचे लोक तो पाहू शकतात याप्रमाणे त्याचं वर्गीकरण करावं लागणार आहे. म्हणजेच आता OTT प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेटला आता यापुढे एक classification ratings द्यावं लागणार आहे.

नव्या नियमानुसार, आता नेटफ्लिक्स (Netflix), अमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिस्ने हॉटस्टार (Disney Hotstar) सारख्या सगळयाच OTT platforms ला आता एडल्ट कंटेंट दाखवण्यापूर्वी त्याला ‘A’ रेटींग द्यावं लागेल. मनीकंट्रोलने याबात अधिक माहिती दिली आहे. OTT platforms वर बऱ्याच काळापासून सातत्याने अश्लीलता पसरवण्याचा आरोप होत आहे. तसंच इथल्या कंटेट वर कोणाच लक्ष देखील नसतं अशा बऱ्याच युजर्सच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच सरकारने आता हा नवीन कायदा लागू केला आहे. यानुसार आता 18 वर्षांखालील मुले आता अॅडल्ट कंटेंट पाहू शकणार नाहीत.

अवश्य वाचा -    Social media ची लगाम आता मोदी सरकारच्या हातात; केंद्रानं जारी केली नवीन नियमावली

पाहा कंटेट रेटिंगनुसार 6 कॅटेगरी:

1) U कॅटेगरी: या कॅटेगरी मधील कंटेंट कोणीही पाहू शकेल. ही कॅटेगरी सगळ्यांसाठी खुली आहे.

2) U/A कॅटेगरी: या कॅटेगरी मधील कंटेंट सुद्धा सगळे पाहू शकतात पण यात असेही काही दृश्य असू शकतात जी लहान मुलांना पाहण्यासाठी योग्य नाहीत.

याशिवाय मुलांसाठी दोन प्रवर्गही तयार करण्यात आले आहेत, U/A- 7+ आणि U/A 13+

3) U/A- 7+ कॅटेगरी: यामधला जो कंटेंट असेल त्यात हिंसेची दृश्य असू शकतात पण सोबतच विनोद आणि कल्पनात्मक कंटेंट असण बंधनकारक आहे.

4) U/A 13+ कॅटेगरी: यामध्ये हिंसेची अशी दृश्य असू शकतात जी पाहताना अगदी वास्तविक वाटू शकतात.

परंतु या दोन्ही कॅटेगरी मध्ये ( U/A- 7+  आणि U/A 13+ ) नग्नता, सेक्स आणि अश्लील गोष्टी नसाव्यात.

5) U/A 16+ कॅटेगरी: यामध्ये हिंसा आणि लैंगिक अत्याधिकतेसह स्वतःला इजा पोहचवण्याचे दृश्य सुद्धा असू शकतात. इथे ड्रग्सचा वापर सुद्धा दाखवला जाऊ शकतो आणि सोबतच कठोर आणि अश्लील भाषेचा उपयोग सुद्धा मान्य आहे.

6) A कॅटेगरी: या कॅटेगरीमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर सेक्स, हिंसा, आपत्तीजनक शब्द यांचा समावेश असलेला कंटेंट दाखवता येऊ शकतो. यात न्यूडिटी सोबतच सेक्स सीन आणि ड्रग्सचा वापर दाखवायला सुद्धा परवानगी आहे.

First published:
top videos

    Tags: Netflix, OTT, Social media