• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'देवमाणूस' परत येणार? अर्धवट शेवट झाल्याने चाहते नाराज

'देवमाणूस' परत येणार? अर्धवट शेवट झाल्याने चाहते नाराज

डॉक्टर एका दवाखान्यात अॅडमिट आहे. व तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘देवमाणूस 2’ची (Devmanus season 2) उत्सुकता वाढली आहे.

  • Share this:
    मुंबई 17 ऑगस्ट :  झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील प्रचंड लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्यामुळे चाहते फारच उत्सुक होते. पण शेवटी प्रेक्षकांची निराशाच झालेली पाहायला मिळाली. तर सोशल मीडियावरही अनेकांनी संताप व्यक्त केला. आता तरी देवी सिंग पोलिसांच्या ताब्यात जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं पण तसं झालं नाही. दरम्यान शेवटी चंदाचा आणि विजयचा मृत्यू दाखवला आहे. याशिवाय नव्यानेच मालिकेत एन्ट्री दाखवलेल्या स्त्रीचा देखील डॉक्टर ने खून केलेला दाखवला आहे. वाड्यातील लोकांना देवमाणसाचा खरा चेहरा मात्र समजला नाही.
    चंदा आणि डॉक्टरचा मृत्यू झाल्याचं लोकांना समजत. तर डॉक्टरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकूणच संपूर्णपणे अनपेक्षित शेवट पाहायला मिळाला आहे. दरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला नसून तो जिवंत आहे. डिम्पलने चंदाचा खून केला. तर तिची बॉडी देखील जाळून टाकली. याशिवाय आणखी एक बॉडी तिथे जळत असते. तिच्या आजूबाजूला डॉक्टर च साहित्य पसरवलेल असतं. त्यामुळे डॉक्टरचाच मृत्यू झाल्याचं डिम्पलने भासावल होतं. तर आता ती देखील घरातून पळून गेली आहे. डॉक्टर एका दवाखान्यात अॅडमिट आहे. व तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘देवमाणूस 2’ची (Devmanus season 2) उत्सुकता वाढली आहे. तर मालिकेचा अद्याप शेवट झाला नसल्याने आणखी एक भाग येणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी शेवट योग्य केला नाही यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा मलिकचा दुसरा भाग येणार यात अजूनही संभ्रम आहे. मालिकेच्या प्रोडक्शन टीम कडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
    Published by:News Digital
    First published: