मुंबई 09 मार्च : कपूर कुटुंबाच्या चिंतेत आता पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या आजारी आहे. अशी माहिती समोर येत आहे, की आई नीतू कपूरनंतर आता रणबीरलाही कोरोनाची (Coronavirus) लागण झाली आहे. अभिनेता सध्या क्वारंटाईन असून आराम करत आहे. रणबीरच्या आजारपणाबद्दलची बातमी समोर आल्यानंतर रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी याबद्दलची खरी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं, की ही गोष्ट खरी आहे, की रणबीर सध्या आजारी आहे. कोरोना महामारीसोबत (Coronavirus) लढण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे, मात्र कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरलाही कोरोनाची लागण झाली आहे. पिंकविलानं दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर सध्या क्वारंटाईनमध्ये असून आराम करत आहे. याबद्दल जेव्हा रणबीरचे चुलते रणधीर कपूर यांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, की रणबीरची तब्येत ठीक नाही. मात्र, त्याला कोरोना झाला आहे, की नाही हे माहिती नाही. ते पुढे म्हणाले, की मी सध्या शहराच्या बाहेर आहे. यानंतर आता चाहत्यांनी आलिया भट्ट आणि अयान मुखर्जीसाठीही काळजी व्यक्त केली आहे. कारण नुकतंच आलिया आणि अयान दोघंही ब्रह्मास्त्रच्या सेटवर रणबीरसोबत होते. याआधी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील जुग जुग जियो या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या याच दरम्यान अभिनेता वरुण धवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. वरुणशिवाय अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, मलायका अरोरा या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ब्रह्मास्त्र सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. हा सिनेमा तीन भागात बनवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.