मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /इरफान खानच्या फोटोसोबत मुलाने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; चाहते झाले भावुक

इरफान खानच्या फोटोसोबत मुलाने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; चाहते झाले भावुक

दिवंगत अभिनेता इरफान खानचा  (Irrfan Khan)  मुलगा बाबिल खान  (Babil Khan)  याने इंस्टाग्रामवर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो आणि त्याची आई सुतापा सिकंदर दिसत आहेत.

मुंबई, 4 नोव्हेंबर-  दिवंगत अभिनेता इरफान खानचा  (Irrfan Khan)  मुलगा बाबिल खान  (Babil Khan)  याने इंस्टाग्रामवर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो आणि त्याची आई सुतापा सिकंदर पोज देताना दिसत आहेत. बाबिल त्याच्या आईसोबत दिवाळी साजरी  (Diwali 2021)  करण्यासाठी सज्ज दिसत आहे. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये, 'दिवाळीच्या शुभेच्छा.'असं लिहिलं आहे. यासोबतच त्याने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.मात्र या फोटोचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ते पाहून सर्व लोक भावुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by Babil (@babil.i.k)

बाबिलनं काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाबिल आणि सुतापा इरफानच्या भिंतीवर लटकलेल्या फोटोसोबत पोज देत आहेत. भिंत वेगवेगळ्या नमुन्यांच्या सिरेमिक प्लेट्सने सजलेली आहे. फोटोमध्ये, एक वनस्पती प्रकाशाने चमकताना दिसत आहे. इरफानचा हा फोटो पाहून चाहते भावूक होत आहेत.

चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी बाबिलला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सेलिना जेटलीने तिच्या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले, 'क्यूटेस्ट कपल. शुभेच्छा.’ दुसऱ्या एका चाहत्याने बाबिल आणि इरफानच्या पोझमध्ये साम्य दाखवले आणि लिहिले, 'पोझकडे लक्ष दिल्याशिवाय राहू शकलो नाही.'

दोन वर्षांपासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरशी झुंज दिल्यानंतर गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी इरफानचा मृत्यू झाला होता. बाबिलने सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला होता.

(हे वाचा:Allu Arjun आणि Ram Charanनं फॅमिलीसोबत केलं Pre-Diwali सेलेब्रेशन; Inside Photo)

बाबिल लवकरच अन्विता दत्त दिग्दर्शित 'काला' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो अभिनय विश्वात पदार्पण करणार असून, या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी दिसणार आहे. तिने आणखी एक चित्रपट साइन केला आहे, जो शुजित सरकार दिग्दर्शित करत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Irrfan khan