जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / IPS विश्वास नांगरे पाटलांचं 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याशी आहे खास कनेक्शन; घेतलंय एकत्र शिक्षण

IPS विश्वास नांगरे पाटलांचं 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याशी आहे खास कनेक्शन; घेतलंय एकत्र शिक्षण

IPS विश्वास नांगरे पाटलांचं 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याशी आहे खास कनेक्शन; घेतलंय एकत्र शिक्षण

IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं एका बॉलिवूड अभिनेत्याशी खास नातं आहे. त्यांच्यातल्या स्नेहाचे बरेच किस्से सुद्धा प्रसिद्ध आहेत. कोण आहे हा अभिनेता?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 जुलै: बॉलिवूडचा एक आघाडीचा अभिनेता आणि महाराष्ट्र पोलीस दलातील एक मोठं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या या दोन व्यक्तींचं एक भन्नाट कनेक्शन सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई शहराचे साधायचे जॉईंट कमिशनर असलेले IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) आणि बॉलिवूडचा एक अग्रगण्य अभिनेता आर माधवन (R Madhvan) या दोन व्यक्तिमत्त्वाचं एक सॉलिड नातं सध्या बरंच चर्चेत येत आहे. विश्वास नांगरे पाटील आणि माधवन हे दोघे एका कॉलेजात शिकायचे. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दोघांनी शिक्षण घेतलं (R Madhvan and Vishwas Nangare Patil connection) आहे. दोघेही एकाच बॅचमध्ये शिकलेले आहेत एवढंच नव्हे तर दोघे रूम सुद्धा शेअर करायचे. विश्वास यांनी त्यांच्या पुस्तकात सुद्धा मॅडीबद्दल अनेक किस्से शेअर केले आहेत. आर माधवनने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विश्वास यांच्याबद्दल बऱ्याच आठवणी शेअर केल्या आहेत. तो असं म्हणतो, “आमच्या कॉलेजच्या सुरुवातीचे दिवस मला आठवतात जेव्हा आम्ही एकत्र होतो. ते फारच विलक्षण होते आणि मुळात त्यांना जे मिळवायचं आहे त्याबाबत त्यांचे विचार स्पष्ट होते. मी आणि ते NCC मध्ये एकत्र होतो. मला आठवतं कॉलेजमध्ये असताना आमच्यात कायम स्पर्धा असायची. शेवटच्या दिवशी कॉलेजमध्ये बेस्ट राजारामियन पुरस्कारासाठी आमच्यामध्ये चुरस होती. त्यांना तो पुरस्कार मिळाला आणि ते मला येऊन म्हणाले सुद्धा माझ्यापेक्षा तू या पुरस्कारासाठी पात्र आहेस. आमचं नातं आतासुद्धा खूप नीट आहेत. ते कायम माझ्याशी चांगले वागत आले आहेत. त्यांनी तर अनेक गोष्टी त्यांच्या पुस्तकात सुद्धा लिहिल्या आहेत.” हे ही वाचा-  ऑगस्ट महिन्यात दोन मराठी सिनेमांची टक्कर, एकाच दिवशी होणार ‘हे’ दोन सिनेमे रिलीज “मॅडी सध्या त्याच्या एका सिनेमामुळे खूप चर्चेत येतो आहे. प्रसिद्ध वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा ‘रॉकेटरी- द नंबी इफेक्ट’ साठी त्याचं बरंच कौतुक होताना दिसत आहे.

जाहिरात

या सिनेमात त्यांनी नंबी नारायण यांच्या दुर्लक्षित झालेल्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला आहे आणि असे विषय समोर आणणं आपलं कर्तव्य आहे असं सुद्धा त्याने अनेकदा सांगितलं आहे.

साऊथ अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या माधवनचे महाराष्ट्राशी फार उत्तम संबंध आहेत. त्याची पत्नी सुद्धा मराठी भाषिक आहे तसंच त्याचं शिक्षण महाराष्ट्रात झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात