मुंबई, 12 मे : मागच्या 2 महिन्यांपासून भारतात सुरू असलेल्या 'IPL 019'चा थरार आज संपणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन तगड्या संघांमध्ये आजचा शेवटचा महामुकाबला हैदराबाद येथे रंगत आहे. या सामन्यासोबत बॉलिवूड कलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सनी 'IPL 019' संगता होणार आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांनी या ठीकाणी त्यांचा आगामी सिनेमा 'भारत'च्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेट लीनं सलमान आणि कतरीनाची मुलाखत घेतली.
ब्रेट लीनं मुलाखतीमध्ये कतरीना आणि सलमानला तुम्ही या सामन्यात कोणाला सपोर्ट करणार असं विचारताच कतरीनानं लगेचच मुंबई इंडियन्सला असं उत्तर दिलं. ती म्हणाली, मुंबई इंडियन्सचा या वर्षीतील परफॉर्मन्स पाहता मुंबई जिंकेल आणि मी मुंबईकर असल्यानं मी मुंबईला सपोर्ट करेन. तर सलमान म्हणाला, चेन्नई सुपर किंग्समध्ये धोनी आणि हरभजन हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र मी चेन्नई सुपर किंग्सला नाही तर मुंबई इंडियन्सला सपोर्ट करणार असं उत्तर दिलं. यासोबतच सलमाननं धोनी आणि हरभजनला या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी एक गेमही खेळला. ज्यात त्यांना हावभाव करुन खेळाडूचं नाव ओळखायचं होतं.
MI vs CSK : रोहित की धोनी ? कोणाचा निर्णय ठरणार अचूक
Not too long before Bharat stars @BeingSalmanKhan and Katrina Kaif join forces with @BrettLee_58 on #MarutiSuzukiCricketLIVE!
Catch the trio in conversation, LIVE NOW, only on Star Sports! pic.twitter.com/0IlFqIt2Y1
— Star Sports (@StarSportsIndia) May 12, 2019
सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 'भारत' हा साउथ कोरियन 'ओड टू माय फादर' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमामध्ये 1950 ते 2014 पर्यंतचा काळ एका सामान्य व्यक्तीच्या नजरेतून मांडण्यात आला होता आणि 'भारत'मध्येही काहीसं असंच दाखवण्यात आलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळापासून एक सामान्य नागरिक ते नौदल अधिकारी असा प्रवास सलमान मोठ्या पडद्यावर साकारत आहे. 'भारत'मध्ये सलमानसोबत दिशा पटानी आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 5 जूनला ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
MI vs CSK : हा ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतो, धोनी CSKचा नाही तर संपूर्ण देशाचा कॅप्टन !