MI vs CSK : रोहित की धोनी ? कोणाचा निर्णय ठरणार अचूक

MI vs CSK : रोहित की धोनी ? कोणाचा निर्णय ठरणार अचूक

मुंबईनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, धोनीचं मत काही वेगळच होतं.

  • Share this:

हैदराबाद, 12 मे : तब्बल दोन महिन्यांच्या रणसंग्रामानंतर आज अखरे मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात फायनल रंगणार आहे. हा सामना हायवोल्टेज होणार यात काही वाद नाही. दरम्यान, मुंबईनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईनं एक बदल केला असून जयंत यादव ऐवजी मॅकलेगनला संघात संधी देण्यात आली आहे. टॉस जरी मुंबईनं जिंकला असला तरी, धोनीनं मात्र टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला असता, असं मत व्यक्त केलं. त्यामुळं चाहत्यांमध्ये आता रोहित की धोनी ? कोणाचा निर्णय अचूक ठरणार हे आता सामन्याच्या अंतीच कळेल.

दरम्यान, हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर आतापर्यंत तीन वेळा 200चा आकडा पार करण्यात आला. सनरायजर्स हैदराबादचे होम ग्राऊंड असलेल्या या मैदानावर एकूण 8 सामने खेळले गेले. यात तीन सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं तीन वेळा 200चा आकडा पार केला. दरम्यान या हंगामाक मुबई इंडियन्सनं या मैदानावर 137 धावा केल्या होत्या. तर, या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाला केवळ 96 धावांत बाद करत सामना जिंकला होता.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईला त्यांच्याच घरात पराभूत करुन मुंबईनं थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला. चेन्नईने दिल्लीला पराभूत करून फायनलला धडक मारली. मुंबईची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी पाहता त्यांना विजेतेपदाचं दावेदार मानलं जात आहे. रोहित आणि धोनी हे दोघही कर्णधार म्हणून बलाढ्य असले तरी, यांच्यात आज काटे की टक्कर होणार आहे.

अंतिम सामन्यातला शानदार रेकॉर्ड

2013मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ गेल्या सहा वर्षात सर्वात जास्त यश मिळवलेला संघ आहे. मुंबईच्या संघानं 2013, 2015, 2017 अशी तीन विजेतेपदं मिळवली आहेत. त्यानंतर यंदा मुंबईच्या संघानं अंतिम सामन्यात धडक मारली आहे. एवढचं नाही तर मुंबईच्या संघाची अंतिम सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. मुंबईचा संघ एकूण 4 वेळा अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्यात 3 वेळा त्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. तर, चेन्नईनं 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015 आणि 2018मध्ये फायनलमध्ये धडक मारली आहे. पण या संघानं केवळ तीन वेळा विजेतेपद मिळवलं आहे.

चेन्नई विरोधात सर्वात चांगलं प्रदर्शन

आयपीएलमधला सर्वात मोठा सामना म्हणजे मुंबई आणि चेन्नई यांच्यातला. दरम्यान या द्वंद्व युध्दात मुंबईचं प्रदर्शन जास्त चांगलं आहे. दोन्ही संघांनी एकूण 27 सामने खेळले आहेत. यात मुंबईनं 16 तर चेन्नईनं 11वेळा सामना जिंकला आहे. त्यामुळं जर चेन्नई अंतिम सामन्यात पोहचला तर, मुंबई फायनल जिंकू शकते.

वाचा- मुंबईच्या विजेतेपदासाठी धोनीचा 'चॅम्पियन' उतरणार मैदानात?

वाचा- MI vs CSK : ‘या’ खेळाडूचा वाढदिवस मुंबईसाठी ठरणार लकी ?

वाचा- 'शर्माजी का बेटा' फायनलसाठी चेन्नईचा 'लक फॅक्टर' ठरणार?

SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

First published: May 12, 2019, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading