Dadasaheb Phalke: ज्या चित्रपटासाठी घ्यावे लागले होते बायकोकडून पैसे त्या सिनेमानं आयुष्यच बदललं

Dadasaheb Phalke: ज्या चित्रपटासाठी घ्यावे लागले होते बायकोकडून पैसे त्या सिनेमानं आयुष्यच बदललं

द लाईफ ऑफ ख्राइस्ट हा दादा साहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचा महत्त्वाचा चित्रपट ठरला. असं सांगतात की ख्राइस्टच्या जीवनावरील चित्रपट तयार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून पैसे उधार घेतले होते.

  • Share this:

मुंबई 16 फेब्रुवारी : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादा साहेब फाळके (Dadasaheb Phalke)  यांनी चित्रपटाचं तंत्र शिकण्यासाठी आणि चित्रपट निर्मितीसाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचं नाव धुंडिराज गोविंद फाळके होतं. त्यांचा जन्म मुंबईत 30 एप्रिल 1870 ला झाला. त्यांनी मुंबईतल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून ड्रॉईंग आणि पेंटिंगचं शिक्षण घेतलं होतं. त्यांनी बडोद्यातल्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीतून ऑईल पेंटिंग व वॉटरकलर पेंटिंगचा कोर्स केला होता. दादासाहेब फाळकेंचं 16 फेब्रुवारी 1944 ला निधन झालं.

दादासाहेबांनी 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र ही पूर्ण लांबीची फीचर फिल्म तयार केली. हा मूकपट होता. ते केवळ चित्रपट दिग्दर्शकच नव्हते तर ते एक निर्माते आणि पटकथा लेखकही होते. आपल्या 19 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 95 चित्रपट आणि 27 शॉर्टफिल्म निर्माण केल्या. द लाईफ ऑफ ख्राइस्ट हा चित्रपट महत्त्वाचा ठरला. असं सांगतात की ख्राइस्टच्या जीवनावरील चित्रपट तयार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीकडून पैसे उधार घेतले होते. राजा हरिश्चंद्र या त्यांच्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीला सहा महिन्यांचा वेळ लागला. या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामतीची भूमिका करायला त्या काळात महिला तयार होत नव्हत्या. कारण त्या काळात महिला चित्रपटांत काम करत नसत. त्यामुळे त्यांनी अण्णा साळुंखे यांना तारामतीची भूमिका करण्यासाठी तयार केलं आणि त्यांनी ती भूमिका उत्तम केली.

नंतर त्यांच्या चित्रपटांमध्ये स्रियांनी भूमिका केल्या. बीबीसीच्या रिपोर्टनुसार त्यांच्या भस्मासूर मोहिनी चित्रपटात दोन महिलांनी कामं केलं होतं. त्यांची नावं दुर्गा आणि कमला होती. दादासाहेबांनी तयार केलेला शेवटचा मूकपट सेतूबंधन. दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने 1969 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यास सुरुवात केली. चित्रपट क्षेत्रात अनमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं.

Published by: Kiran Pharate
First published: February 16, 2021, 4:00 PM IST

ताज्या बातम्या