जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ट्विटरनंतर आता इन्स्टानेही घेतला कंगनाशी पंगा; मोठी कारवाई केल्यानं भडकली अभिनेत्री

ट्विटरनंतर आता इन्स्टानेही घेतला कंगनाशी पंगा; मोठी कारवाई केल्यानं भडकली अभिनेत्री

ट्विटरनंतर आता इन्स्टानेही घेतला कंगनाशी पंगा; मोठी कारवाई केल्यानं भडकली अभिनेत्री

आता इन्स्टाग्रामनंदेखील (Instagram Deleted Kangana Ranaut’s Post) कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे. यानंतर भडकलेल्या अभिनेत्रीनं आपण इथे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकेल, असं वाटतं नसल्याचं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 09 मे : कंगना रणौत (Kangana Ranaut) सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. काही वादग्रस्त ट्विटमुळे याआधीच कंगनाचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड (Kangana Ranaut’s Twitter Account Suspended) केलं गेलं आहे. यानंतर अभिनेत्री इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय झाली आहे. अशात आता इन्स्टाग्रामनंदेखील (Instagram Deleted Kangana Ranaut’s Post) तिची पोस्ट डिलीट केली आहे. यानंतर भडकलेल्या अभिनेत्रीनं आपण इथे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकेल, असं वाटतं नसल्याचं म्हटलं आहे. शनिवारी कंगनानं एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं, की तिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं कोरोना साधा ताप असल्याचं म्हटलं होतं. तिच्या या पोस्टवरुन वाद झाल्यानं इन्स्टाग्रामनं ही पोस्ट डिलीट केली. कंगनानं स्वतःच इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. अभिनेत्रीनं लिहिलं, इन्स्टाग्रामनं माझी पोस्ट डिलीट केली आहे. यात मी कोरोनाला संपवण्याची धमकी दिली होती. यामुळे कोणाच्यातरी भावना दुखावल्या. म्हणजेच दहशतवादी आणि कम्यूनिस्ट लोकांबद्दल सहानुभूती असलेल्यांबद्दल ऐकलं होतं. मात्र, कोरोनाचा फॅन क्लब! विशेष आहे! इन्स्टावर मला दोनच दिवस झालेत, मात्र इथे मी एका आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकेल, असं वाटत नाहीये. या पोस्टवरुन सुरू झाला वाद - कंगनानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, की मागील काही दिवसांपासून थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे. डोळ्यांमध्येही थोडा त्रास होत आहे. हिमाचलला जाण्यासाठी मी माझी कोरोना चाचणी केली होती. तिचा रिपोर्ट आला आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. मला अजिबातही कल्पना नव्हती, की हा व्हायरस माझ्या शरीरामध्ये आहे. आता मला माहिती आहे, की मी याला संपवून टाकेल. तिनं पुढे लिहिलं, की जर तुम्ही घाबरला तर तो तुम्हाला घाबरवेल. चला या कोरोनाला संपवू. हा कोरोना काहीच नाही, केवळ एक साधा ताप आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात