मुंबई, 12 सप्टेंबर : अभिनेत्री हृता दुर्गुळे अवघ्या महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते. आज या लाडक्या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. हृता दुर्गुळे आज 12 सप्टेंबर 2022 रोजी 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’, ‘टाइमपास 3’ आणि ‘अनन्या’ यातून अभिनेत्री घराघरात पोहोचली. आज वाढदिवशी तिच्यावर सगळीकडूनच शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे. मात्र एका स्पेशल व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छांची खास चर्चा सध्या होतेय. तो व्यक्ती म्हणजे हृताचा नवरा प्रतिक शाह. त्याने रोमँटिक फोटो पोस्ट करत हृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृताचं लग्न झाल्यापासून ती तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण तिचा नवरा सुद्धा वेळोवेळी सोशल मीडियावर हृताचे कौतुक करत. तिला शुभेच्छा शेअर करत असतो. आजही त्याने हृतासाठी खास बर्थडे पोस्ट शेअर केली आहे. प्रतिक शाह याने त्या दोघांचा एक छान फोटो पोस्ट करत लिहिलं आहे कि, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा लव्ह. जशी तू एका वर्षाने मोठी झाली आहे, एका वर्षाने अधिक शहाणी होत आहेस, अधिक जागरूक आणि जबाबदार होत आहेस त्यामुळे तू मुळात माझ्याकडे एका वर्षाने जवळ येत आहेस. देव तुला जीवनातील सर्व सुख आणि यश देवो! आमच्यासाठी आशीर्वाद बनून आल्याबद्दल धन्यवाद.’ अशा शब्दांमध्ये प्रतीकने हृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रतीकच्या या पोस्टवर हृताने ‘थँक्यू हसबंड ’ अशी कमेंट केली आहे. तर चाहत्यांनी देखील या पोस्टवर कमेंट करत हृताला शुभेच्छा दिल्या आहेत. हेही वाचा - Ranveer singh : रणवीर सिंगचा ‘पुष्पा’ अवतार; अल्लू अर्जुन समोरच म्हणाला ‘मै झुकेगा नही’; पहा व्हिडीओ हृतासाठी 2022 हे वर्ष खूपच खास ठरलं. कारण यावर्षी तिचे ‘टाइपास 3’ आणि ‘अनन्या’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. तर ‘मन उडू उडू झालं’ ही तिची मालिकाही खूप गाजली. दरम्यान 2022 हे वर्ष आणखी एका कारणामुळे हृतासाठी खास होतं, ते कारण म्हणजे तिचं लग्न. हृताने निर्माता प्रतिक शाहसोबत लग्न करत तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. हृता लवकरच आता ओटीटीवरही पदार्पण करणार आहे. महेश मांजरेकर ‘एका काळेचे मणी’ ही वेबसीरिज घेऊन येत आहेत. या सीरिजमध्ये हृतासह प्रशांत दामले, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, वंदना गुप्ते, पौर्णिमा मनोहर, ऋषी मनोहर, ऋतुराज शिंदे असे कलाकार आहेत. हृता यात मीरा काळे ही भूमिका साकारत आहे. तिचे वडील श्रीनिवास काळे ही भूमिका प्रशांत दामले साकारत आहेत.