मुंबई, 12 ऑगस्ट- प्रसिद्ध मॅचमेकर सीमा टपारिया अर्थातच ‘सीमा आंटी’ पुन्हा एकदा आपल्या शोसह परतल्या आहेत. सीमा यांचा ‘इंडियन मॅचमेकिंग’ हा शो प्रचंड लोकप्रिय झाला होता. हा शो जितका लोकप्रिय आहे तितकाच वादग्रस्तसुद्धा आहे. परंतु आता सीमा या शोच्या दुसऱ्या सीजनसह प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. परत येताच त्यांनी आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या जोडीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. ‘इंडियन मॅचमेकिंग’ या शोचं मुख्य वैशिष्ट्य सांगताना सीमा म्हणतात की, त्या कोणत्याही नात्यामध्ये वयातील अंतरावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. या सीजनमध्ये त्या जास्त वयाच्या महिलांनी आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांबाबत लग्न करण्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान सीमा यांनी बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनस या प्रसिद्ध सेलिब्रेटी कपलवर भाष्य केलं आहे.
याबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय, ‘‘जर एखादा मुलगा सात वर्षांनी मोठा असेल तर ठीक आहे. परंतु जर मुलगी मुलापेक्षा सात वर्षांनी मोठी असेल तर, … मला माहित नाही. मी कदाचित जुन्या विचारांची असेन. प्रियांका आणि निकबाबत बोलताना त्यांनी पुढं म्हटलं, ‘त्यांनी लग्न केलंय. मला माफ करा पण मला नाही वाटत त्यांची जोडी शोभून दिसते. कारण तो तिच्यासमोर खूपच लहान दिसतो आणि ती तितकीच मोठी दिसते’. असं म्हणत सीमा यांनी पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. **(हे वाचा:** Urvashi Rautela: उर्वशी रौतेलानं ऋषभ पंतला म्हटलं ‘छोटू भैय्या’; क्रिकेटरच्या पोस्टनंतर अभिनेत्रीने पुन्हा घेतली फिरकी ) सीमा यांनी ‘इंडियन मॅचमेकिंग 2’ मधून नेटफ्लिक्सवर वापसी केली आहे. या शोचा पहिला सीजन 2020 मध्ये भेटीला आला होता. या शोमध्ये सीमा आपल्या कस्टमर्सना त्यांचा परफेक्ट जोडीदार शोधण्यासाठी मदत करतात. या शोचा दुसरा सीजन 10 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर सुरु झाला आहे.