जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Abhijeet Sawant: कुठे गायब आहे Indian Idol चा पहिला विजेता? लोकांकडून खाल्ला मार, आज जगतोय असं आयुष्य

Abhijeet Sawant: कुठे गायब आहे Indian Idol चा पहिला विजेता? लोकांकडून खाल्ला मार, आज जगतोय असं आयुष्य

सध्या कुठे आहे इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजित सावंत

सध्या कुठे आहे इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजित सावंत

Indian Idol 1st Winner Abhijeet Sawant: छोट्या पडद्यावर सध्या अनेक रिऍलिटी शो धुमाकूळ घालत आहेत. त्यातीलच एक सुपरहिट शो म्हणजे ‘इंडियन आयडॉल’ होय. नुकतंच या शोचा तेरावा सीजन पार पडला. ऋषी सिंग हा या सीजनचा विजेता ठरला. यावेळी अनेकांना इंडियन आयडॉलच्या पहिल्या विजेत्याची आठवण झाली.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,8 एप्रिल- छोट्या पडद्यावर सध्या अनेक रिऍलिटी शो धुमाकूळ घालत आहेत. त्यातीलच एक सुपरहिट शो म्हणजे ‘इंडियन आयडॉल’ होय. नुकतंच या शोचा तेरावा सीजन पार पडला. ऋषी सिंग हा या सीजनचा विजेता ठरला. यावेळी अनेकांना इंडियन आयडॉलच्या पहिल्या विजेत्याची आठवण झाली. तब्बल 19 वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या शोचा पहिला सीजन प्रचंड चर्चेत आला होता. सोबतच शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धकसुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले होते. मराठमोळा स्पर्धक अभिजित सावंत या शोच्या पहिल्या सीजनचा विजेता ठरला होता. सध्या अभिजित कुठे आहे? आणि काय करतो? असा प्रश्न अनेकांना पडतो. ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या सीजनचा विजेता बनून अभिजीतने नवा इतिहास रचला होता. या शोमुळे अभिजीत सावंत रातोरात स्टार बनला होता. पण त्याचं स्टारडम फार काळ टिकू शकलं नाही. शोच्या काही वर्षांनंतर तो केव्हा आणि कुठे गायब झाला हे लोकांना कळलंही नाही. ‘इंडियन आयडॉल’चा पहिला विजेता ठरलेला गायक अभिजीत सावंत सध्या मनोरंजन सृष्टीतून गायब आहे. बऱ्याच दिवसांनंतर, अभिजीत रस्त्यावर मारहाण झालेल्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. पण त्यानंतर तो पुन्हा गायब झाला. अभिजीत सावंत हा मूळचा महाराष्ट्रीयन आहे. त्याचा जन्म 7 ऑक्टोबर 1981 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला होता. (हे वाचा: Kriti Sanon-Prabhas: वरुण धवनने का पसरवलेली क्रिती सेनन-प्रभासच्या अफेयरची अफवा? समोर आलं खरं कारण ) इंडियन आयडॉलनांतर अभिजीत सावंत काही ऍल्बममध्ये झळकला होता. अभिजीत सावंतचा पहिला ऍल्बम ‘आप का अभिजीत’ 2005 साली आला होता. यामध्ये ‘मोहब्बतें लुटाऊंगा ’ आणि ‘लफ्जों में कह ना सकू’ ही गाणी तुफान लोकप्रिय ठरली होती. यानंतर अभिजीतचा दुसरा म्युझिक ऍल्बम ‘जुनून-अभिजीत सावंत’सुद्धा भेटीलाआला होता. या ऍल्बमचा टायटल ट्रॅक ‘जुनून’ लोकांना प्रचंड आवडला होता. 2005 मध्ये अभिजीतने ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण केलं होतं. यामध्ये त्याने ‘मरजावां मिटजांवां’ हे सुपरडुपर हिट गाणं गायलं होतं.

‘इंडियन आयडॉल’ जिंकल्यानंतर अभिजीतने पत्नी शिल्पासोबत ‘नच बलिये-4’ या डान्स शोमध्ये सहभागी झाला होता. अनेक रिऍलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर, अभिजीतने 2009 मध्ये बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. ‘लॉटरी’ हा त्याचा पहिला सिनेमा होता जो बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. यानंतर तो अक्षय कुमारच्या ‘तीस मारखां’मध्ये एका छोट्या भूमिकेत दिसला होता. पण यावेळी त्याला हवं तसं यश मिळालं नाही.

News18लोकमत
News18लोकमत

2010 मध्ये एकदा मित्रांसोबत कारमधून फेरफटका मारताना त्यांची कार एका स्कुटरला धडकली होती. यावेळी अभिजीतसुद्धा कारमध्ये उपस्थित होता. या प्रकाराने जमलेल्या जमावाने अभिजीतलासुद्धा चोप दिला होता. ज्यामुळे त्याची इमेज फारच खराब झाली होती.सध्या अभिजीत विविध स्टेज शो आणि कॉन्सर्ट करत असतो. शिवाय तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात