Home /News /entertainment /

करेक्ट 12 ला पोस्ट करत पवनदीपने अरुणिताला केलं बर्थडे विश, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स

करेक्ट 12 ला पोस्ट करत पवनदीपने अरुणिताला केलं बर्थडे विश, नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स

आज इंडियन आयडॉल 12 मधील लोकप्रिय स्पर्धक अरुणिता कांजीलालचा (Arunita Kanjilal Birthday) वाढदिवस आहे. पवनदीप राजनने (Pavandeep Rajan) आपल्या सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

  मुंबई, 18 जानेवारी-   छोट्या पडद्यावरील 'इंडियन आयडॉल'  (Indian Idol)  हा कार्यक्रम फारच लोकप्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाचा 12 वा सीजन   (Season 12)   पार पडला. हा सीजन प्रचंड गाजला. या कार्यक्रमातील स्पर्धकांनासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळेच आज कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा हे स्पर्धक सतत चर्चेत असतात. आज इंडियन आयडॉल 12 मधील लोकप्रिय स्पर्धक अरुणिता कांजीलालचा  (Arunita Kanjilal Birthday)   वाढदिवस आहे. पवनदीप राजनने   (Pavandeep Rajan)  आपल्या सोशल मीडियावरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची ही पोस्ट पाहून चाहते आता मजेशीर कमेंट्स देत आहेत. 'इंडियन आयडॉल 12' हा सीजन प्रचंड गाजला. कधी स्पर्धकांमुळे तर कधी परीक्षकांमुळे हा कार्यक्रम सतत चर्चेत राहिला. यामध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल,आशिष कुलकर्णी, सवाई भट्ट, सायली कांबळे, नचिकेत लेले, अंजली गायकवाड, मोहम्मद दानिश, शन्मुखप्रिया अशा अनेक स्पर्धकांना विशेष लोकप्रियता मिळाली आहे. या स्पर्धकांनी आपल्या गोड आणि दमदार आवाजाने सर्वांनाच आकर्षित केलं होतं. या कार्यक्रमात अरुणिता आणि पवनदीप यांच्यामध्ये काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच नव्हे तर परीक्षकसुद्धा त्यांची चेष्टामस्करी करत होते. त्यामुळे या दोघांचं अफेयर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सतत होत असतात. परंतु या दोघांनी आपण फक्त मित्र असल्याचं स्पष्ट केलं होतं. कार्यक्रमाला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी ही  चेष्टा मस्करी सुरु असल्याचं सर्वांनीच सांगितलं होतं. परंतु आजही चाहते या दोघांचं अफेयर आहे असंच समजतात.
  अरुणिता आणि पवनदीप यांच्या चाहत्यांना या दोघांची जोडी फारच आवडते. त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच पसंत पडते. त्यामुळे सतत सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात. शिवाय या दोघांच्या प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचं विशेष लक्ष असतं. नुकताच पवनदीप राजनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अरुणिताचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पवनदीपने बरोबर  रात्री 12 वाजता पोस्ट करत अरुणिताला शुभेछा दिल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे. (हे वाचा:ही' टीव्ही अभिनेत्री आहे विकी कौशलची खास मैत्रीण! पाहा थ्रोबॅक VIDEO ) पवनदीप राजनने अगदी 12 वाजताच फोटो पोस्ट करत अरुणिताला शुभेच्छा दिल्याने, चाहते मजेशीर कमेंट्स करत त्याची फिरकी घेत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत म्हटलं आहे, 'भावा राहवत नाही ना, बरोबर 12 वाजताच शुभेच्छा दिल्यास'. तर दुसऱ्याने म्हटलं आहे, 'हॅप्पी बर्थडे उत्तराखंडची वहिनी', तर आणखी एकाने म्हटलं आहे, 'इतक्या लवकर, बहिणीच्या वाढदिवसाला तर इतक्या लवकर विश नाही करत, काय बदल आहे', तर आणखी दुसऱ्याने लिहिलं आहे, तुझी बायको', तर तिसऱ्या एकाने लिहिलं आहे, 'वाटतं तू 12 वाजण्याच्याच प्रतीक्षेत होतास करेक्ट 12 ला विश, वाह्ह्ह'. अशा अनेक मजेशीर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी पवनदीपची फिरकी घेतली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Indian idol

  पुढील बातम्या