मुंबई, 03 एप्रिल : ‘इंडियन आयडॉल 13’ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘इंडियन आयडॉल’ चं हे पर्व तब्बल ९ महिने चाललं. संपूर्ण देशाला या शोच्या विजेत्याची उत्सुकता होती. अखेर 9 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर देशाला या टीव्ही सिंगिग रियालिटी शोच्या 13 व्या पर्वाचा विजेता मिळाला आहे. टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी सिंग, शिवम शाह, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. ट्रॉफीसाठी सर्व स्पर्धकांनी चुरशीची लढत दिली. तसेच इंडियन आयडल फिनालेच्या अखेरच्या टप्प्यात जनेतेने लाईव्ह व्होटिंगद्वारे विजेत्याची निवड केली. विजेत्याचं नाव ऐकून सगळेच खुश झाले आहेत. अयोध्येच्या ऋषी सिंगने बाजी मारत विजेतेपद पटकावलं आहे. ऋषी सिंग या सीझनचा विजेता ठरला आहे, तर देवोस्मिता राय ही पहिली उपविजेती ठरली आहे. तर चिराग कोतवाल याने दुसरा उपविजेता ठरला. ऋषी सिंगने सर्वांना मागे टाकत यंदाचं विजेतेपद पटकावलं आहे. ऋषीवर सध्या देशभरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ऋषी सिंह हा या पर्वाच्या ऑडिशनपासूनच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. त्याच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.ऑडिशनमध्येच प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या ऋषीने अखेर विजेतेपद पटकावल्याने सगळ्यानांच आनंद झाला आहे. सुनील शेट्टीचे वडील करायचे साफसफाईचं काम; आज अभिनेत्यानं कमावलीय कोट्यवधींची मालमत्ता ऋषी जिंकल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. तसेच ऋषीला इथपर्यंत पाठवण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या त्याच्या चाहत्यांनाही आनंद झाला. टॉप 6 फायनलिस्टमध्ये ऋषी याच्यासह शिवम शाह, चिराग कोतवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देबस्मिता रॉय आणि सोनाश्री कर यांचा समावेश होता. मात्र लाईव्ह व्होटिंगच्या आधारावर ऋषीने बाजी मारली. इतर प्रतिस्पर्ध्यांनी ऋषीला चांगली टक्कर दिली. मात्र अखेरीस ऋषीचाच विजय झाला.
Sab pe chalaake apna jaadu, Rocking Rishi ne jeeta sirf humaara dil hi nahi balki Indian Idol ki ye trophy bhi.
— sonytv (@SonyTV) April 2, 2023
A well-deserved contestant of the Indian Idol Season 13.
Congratulations, Rishi! 🤩✨#IndianIdol13 #IndianIdol #IndianIdolTheDreamFinale pic.twitter.com/M9sEU2Kzx9
ऋषी सिंह याला इंडियन आयडल ट्रॉफीसह रोख 25 लाख रुपये बक्षिस आणि 1 मारुती सुझुकी एसयूव्ही कार गिफ्ट म्हणून देण्यात आली. इतकंच नाही तर ऋषीला सोनी म्यूजिक इंडियासह रिकॉर्डिंग कॉन्ट्रॅक्टही मिळालं. एका क्षणात ऋषीच्या भविष्याला कलाटणी मिळाली. दरम्यान या फिनालेमध्ये नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत होते. तर आदित्य नारायण याने यशस्वीपणे या फिनालेचं यशस्वीपणे निवेदन केलं.
ऋषी सिंग हा मूळचा अयोध्या, उत्तर प्रदेशचा आहे. त्याला गाणी लिहिण्याची आणि गाण्याची नेहमीच आवड होती. ऋषी सिंग सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत आहेत. आता इंडियन आयडॉलचं विजेतेपद पटकावल्यानंतर ऋषीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ऋषी सिंह म्हणाला, ‘माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. जेव्हा माझे नाव विजेते म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे.’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.