Home /News /entertainment /

‘...तर कानाखाली आवाज काढेन’; आदित्यच्या त्या वक्तव्यावर अमेय खोपकर संतापले

‘...तर कानाखाली आवाज काढेन’; आदित्यच्या त्या वक्तव्यावर अमेय खोपकर संतापले

आदित्य नारायणला मनसेचा इशारा; त्या कृत्यासाठी माफी माग नाहीतर शोमध्ये धुसुन कानाखाली आवाज काढणार

    मुंबई 24 मे:  इंडियन आयडल (Indian Idol 12) हा संगीत शो सध्या सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. कधी या शोमधील माजी स्पर्धक निर्मात्यांच्या हेकेकोरीपणाचे पुरावे सादर करत आहेत. तर कधी शोमध्ये आलेले पाहुणे कलाकारच जोरदार टीका करत आहेत. आता आणखी एक वाद समोर आला आहे. इंडियन आयडलमध्ये होस्टचं काम करणाऱ्या आदित्य नारायण (Aditya Narayan) याचा एक वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं अलिबागवरुन एका बॅकस्टेज आर्टिस्टला टोला लगावला. मात्र यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) संतापले आहेत. यापुढे अलिबागबद्दल असं काहीही म्हणशील तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन असा रोखठोक इशारा त्यांनी दिला आहे. पाहुया नेमकं काय म्हणाले अमेय खोपकर? ‘मराठी संस्कृतीची इज्जत घालवणं थांबवा’; आशय कुलकर्णीच्या त्या व्हिडीओवर नेटकरी संतापले अमेय खोपकर यांनी एका फेसबुक व्हिडीओद्वारे संपूर्ण प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, "मी आदित्य नारायणचा एक व्हिडीओ पाहिला. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीवर संतापला अन् म्हणाला मी काय अलिबागवरुन आलोय का? त्याचं हे बोलणं आम्हाला खटकलं आहे. आलिबागची लोकं तुम्हाला इतकी मुर्ख वाटतात का? त्यानं आत्ताच्या आत्ता याबाबत माफी मागावी. मी त्याच्या वडिलांसोबतही बोललो आहे. अन् जर त्यानं माफी मागितली नाही. तर त्याच्या कानाखाली आवाज काढून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून दिलं जाईल. यापुढे जर अलिबागबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्य केली गेली तर तिथं तुमचं एकही चित्रीकरण करु दिलं जाणार नाही. यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तुमची गाठ आहे." असा धमकीवजा इशारा अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणला दिला. आदित्य नारायण हा प्रसिद्ध बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील एक गायक आहे. सध्या तो इंडियन आयडलमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे. आदित्य आपल्या वडिलांप्रमाणे मोठा गायक होऊ शकला नाही. मात्र आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमार्फत तो कायम चर्चेत असतो. यापूर्वी त्यानं किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांच्यासोबत पंगा घेतला होता त्यावेळी देखील त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र यावेळी त्याच्या वक्तव्यावर मनसे संतापली आहे. या पार्श्वभूमीवर तो माफी मागणार का? हे नक्कीच पाहण्याजोगे ठरेल. आदित्यनं यावर अद्याप या प्रकरणावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Indian idol, MNS, Shocking video viral

    पुढील बातम्या