जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ashadhi Ekadashi: 'सगुण सावळा पांडुरंग', इंडियन आयडॉल फेम सायली कांबळेची आषाढी एकादशीनिमित्त खास भेट

Ashadhi Ekadashi: 'सगुण सावळा पांडुरंग', इंडियन आयडॉल फेम सायली कांबळेची आषाढी एकादशीनिमित्त खास भेट

Ashadhi Ekadashi: 'सगुण सावळा पांडुरंग', इंडियन आयडॉल फेम सायली कांबळेची आषाढी एकादशीनिमित्त खास भेट

‘पाऊले चालती पंढरीची वाट’…या ओळींप्रमाणे सध्या प्रत्येक भक्ताला माऊलीच्या भेटीची ओढ लागली आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतः च्या पद्धतीने विठुरायाचं दर्शन घेत आहेत. कोणी वारीमध्ये सहभागी होत आहे, तर कोणी वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवत आहे. दरम्यान आता ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12) फेम गायिका सायली कांबळेने (Sayali Kambale) अनोख्या पद्धतीने विठुरायाचं स्मरण केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जुलै-  ‘पाऊले चालती पंढरीची वाट’…या ओळींप्रमाणे सध्या प्रत्येक भक्ताला माऊलीच्या भेटीची ओढ लागली आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतः च्या पद्धतीने विठुरायाचं दर्शन घेत आहेत. कोणी वारीमध्ये सहभागी होत आहे, तर कोणी वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवत आहे. दरम्यान आता ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol 12) फेम गायिका सायली कांबळेने (Sayali Kambale) अनोख्या पद्धतीने विठुरायाचं स्मरण केलं आहे. ‘इंडियन आयडॉल 12’ हा सीजन खूपच लोकप्रिय ठरला होता. यातील प्रत्येक स्पर्धकाला एक विशेष ओळख मिळाली आहे. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे महाराष्ट्राची कन्या सायली कांबळे होय. सायलीला शोमधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान आता सायली कांबळेने तिच्या चाहत्यांसाठी एक फारच आनंदाची बातमी शेअर केली आहे. सायलीने पहिल्यांदाच अभंग गायला आहे. गायिकेने याचा टीजर शेअर करत लिहलंय, ‘‘नमस्कार. मी पहिल्यांदाच अभंग गाण्याचा प्रयत्न केला आहे. माझा खूप चांगला मित्र @pranavmusic94 याने हा अभंग संगीतबद्ध केला असून समृद्धी पांडे हिने लिहीला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उद्या ‘सगुण सावळा पांडुरंग’ हा प्रासादिक अभंग माझ्या युट्युब चॅनलवर प्रकाशित होणार आहे. तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडेल अशी मी आशा व्यक्त करते…’’ **(हे वाचा:** Ashadhi Wari: ‘मला तुझ्याकडून काहीच नको…’ अभिनेता भरत जाधवची पंढरपूरच्या विठुरायाला अनोखी साद )

जाहिरात

सायली कांबळे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत विविध पोस्ट शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. इंडियन आयडॉलनंतर सायलीने अनेक व्हिडीओ सॉंगमध्ये गाणं गायिलं आहे. इतकंच नव्हे तर तिने एका मराठी चित्रपटातील गाण्यासाठीसुद्धा आपला आवाज दिला आहे. सायली सध्या सोनी टीव्हीवरील ‘सुपरस्टार सिंगर 2’ मध्ये कॅप्टनच्या भूमिकेत दिसून येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात