मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /क्रिकेटनंतर बॉलिवूड पिचवर दिसणार शिखर धवनचा जलवा, 'गब्बर'ची सिनेमात होणार दमदार एन्ट्री

क्रिकेटनंतर बॉलिवूड पिचवर दिसणार शिखर धवनचा जलवा, 'गब्बर'ची सिनेमात होणार दमदार एन्ट्री

बॉलिवूड आणि क्रिकेट   (Bollywood & Cricket)  यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने कलाकार आणि क्रिकेटर यांचा संबंध येतच असतो. कधी कलाकार क्रिकेट स्टेडियमवर दिसून येतात. तर कधी क्रिकेटर एन्टरटेनिंग शोमध्ये दिसून येतात.तर काही क्रिकेटर्सनी अभिनयातसुद्धा आपलं नशीब आजमावलं आहे. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई,18 मे- बॉलिवूड आणि क्रिकेट   (Bollywood & Cricket)  यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने कलाकार आणि क्रिकेटर यांचा संबंध येतच असतो. कधी कलाकार क्रिकेट स्टेडियमवर दिसून येतात. तर कधी क्रिकेटर एन्टरटेनिंग शोमध्ये दिसून येतात.तर काही क्रिकेटर्सनी अभिनयातसुद्धा आपलं नशीब आजमावलं आहे. या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव दुसरं कोणतं नसून शिखर धवन  (Shikhar Dhawan Bollywood Entry)  आहे. शिखर लवकरच चित्रपटात झळकणार आहे.

शिखर धवन म्हणजेच 'गब्बर' हा प्रसिद्ध स्पोर्ट्स सेलिब्रिटींपैकी एक आहे. आयपीएल 2022  (IPL 2022) मध्ये, सध्या तो पंजाब किंग्ज (Punjab Kings)  संघाकडून खेळताना दिसत आहे. क्रिकेटच्या मैदानात आपली चमक दाखवल्यानंतर आता शिखर धवन कॅमेऱ्यासमोर आपलं अभिनय कौशल्य दाखवणार आहे. या क्रिकेटरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट टीमचा 'गब्बर' आता बॉलिवूडमध्ये दमदार अंदाजात दिसणार आहे. शिखर धवनजवळ एक चांगला चित्रपट आला आहे. ज्यामध्ये तो आता चक्क अभिनय करताना दिसणार आहे.

खेळाच्या मैदानावर चाहत्यांना वेड लावल्यानंतर शिखर धवन आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.हा लोकप्रिय क्रिकेटर मुख्य प्रवाहातील चित्रपटात आपला अभिनय दाखवताना दिसणार आहे. यासाठी त्याने तयारीदेखील केली आहे. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, गब्बर अर्थातच शिखरने काही काळापूर्वीच आपल्या डेब्यू चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. मात्र, या चित्रपटाचं टायटल अद्यापही समोर आलेलं नाहीय.तथापि आपल्या लाडक्या क्रिकेटरला अभिनय करताना पाहणं हे त्याच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच असणार आहे.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, 'शिखर धवनला कलाकारांबद्दल खूप आदर आहे. आणि जेव्हा त्याला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली तेव्हा तो याबद्दल खूप आनंदी होता. शिखर चित्रपटाच्या त्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं निर्मात्यांना वाटतं. अशा परिस्थितीत जेव्हा निर्मात्यांनी शिखर धवनशी संपर्क साधला तेव्हा तो त्यांना नकार देऊ शकला नाही. असं म्हटलं जात आहे की, गेल्या महिन्यातच शिखर धवनला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. शिखर धवन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.शिखरला चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते फारच उत्सुक आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Cricket, Entertainment, Shikhar dhavan