Home /News /entertainment /

Bhuvan Bam आहे तरी कोण? एकाही चित्रपटात काम न करता झाला लोकप्रिय सेलिब्रिटी

Bhuvan Bam आहे तरी कोण? एकाही चित्रपटात काम न करता झाला लोकप्रिय सेलिब्रिटी

कधीकाळी पबमध्ये लहानशी नोकरी करणारा भुवन बाम कसा झाला कोट्यधीश; आज बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षाही अधिक आहे फॅनफॉलोइंग

  मुंबई 13 जून: कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. (coronavirus) देशभरातील हजारो लोकांनी या कोरोनामुळं आपले प्राण गमावले आहेत. अगदी नामांकित सेलिब्रिटी आणि त्यांचे कुटुंबीय देखील कोरोनाच्या विळख्यातून स्वत:ला वाचवू शकले नाहीत. अशा परिस्थितीत भारतीय प्रेक्षकांसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. (Indian comedian Bhuvan Bam) भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. पण हा भुवन बाम आहे तरी कोण? (Who is Bhuvan Bam) त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकून नेटकरी का हळहळतायेत? आजवर एकाही बॉलिवूड़ चित्रपटात काम न केलेल्या भुवनच्या पालकांसाठी सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली का वाहात आहेत? भुवन बाम हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. किंबहूना भारतातील सर्वात मोठ्या युट्यूबर्सपैकी एक आहे. आजच्या तारखेला तब्बल 20 कोटी नेटकरी त्याला दररोज युट्यूबवर फॉलो करतात. शिवाय लिंकडिन, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतरत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे आणखी जास्त फॉलोअर्स आहेत. तो पाच ते सात मिनिटांचे विनोदी स्किट्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. त्याच्या स्किटचे विषय हे तरुणांच्या आयुष्यावर आधारित असतात. त्यामुळं फारच कमी वेळात त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘तू चूकीच्या माणसाशी पंगा घेतलास’; अभिनेत्याची सलमान खानला धमकी
  View this post on Instagram

  A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

  दिशा पटानी होती या अभिनेत्याच्या प्रेमात; समलैंगिकतेच्या आरोपांमुळं मोडलं लग्न खरं तर भुवनला अभिनयात किंवा स्टँडअप कॉमेडीमध्ये फारसा रस नव्हता. त्याला एक संगीतकार होण्याची इच्छा होती. यासाठी त्यानं विविध वाद्य वाजवण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण देखील घेतलं आहे. परंतु अनेक संगीतकारांचे दरवाजे ठोठावूनही त्याची गाणी ऐकण्यास कोणी तयार नव्हता. त्यामुळं त्यानं एका पबमध्ये ती गाणी गाण्यास सुरुवात केली. या पबमध्ये काही स्टँडअप कॉमेडीचे शो देखील केले जायचे. त्या विनोदी कलाकारांना मिळणारी दाद पाहून आपणही असं काहीतरी करावं असं त्याला वाटायचं. त्यानं यासाठी काही प्रयत्न केले पण त्याला विनोदवीर म्हणून पबमध्ये काम मिळत नव्हतं. अखेर त्यानं स्वत:चं एक युट्यूब चॅनेल सुरु केलं अन् तिथं तो विनोदी स्किट्स सादर करायचा. हळूहळू त्याची ती स्किट्स प्रेक्षकांना आवडू लागली अन् आज तो सर्वात लोकप्रिय युट्यूबर्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या भुवन स्टँडअप कॉमेडीसोबतच हॉलिवूड चित्रपटांमध्ये वॉईज ओव्हर देण्याचं देखील काम करतो. त्यानं आतापर्यंत डेडपूल, कॅप्टन अमेरिका, कॅप्टन मार्व्हल या चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. कधीकाळी गाण्याची एक संधी मिळावी संगीतकारांचे दरवाजे ठोठावणाऱ्या भुवनसोबत काम करण्यासाठी आज नामांकित सेलिबेब्रिटी देखील उत्सुक आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Coronavirus, YouTube Channel, Youtubers

  पुढील बातम्या