मुंबई, 8 नोव्हेंबर : मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई लवकरच आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणार आहे. 'इंडिया लॉकडाऊन' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट कोरोना महामारीच्या वेळी देशातील बिकट परिस्थितीच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटाचा टीझर खूपच भयावह आहे ज्यामध्ये लॉकडाऊन काळातील सत्य परिस्थिती दर्शवली आहे.
सई ताम्हणकरने तिच्या इन्स्टाग्रामवर 'इंडिया लॉकडाऊन' चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझरच्या सुरुवातीलाच भारत सरकारने 21 दिवसांसाठी देशव्यापी लॉकडाउन लागू केल्याचे सांगितले जात आहे. टीझरच्या दुसर्या भागात लॉकडाऊनमुळे इतर शहरांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आणि आपला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. कोरोना महामारीच्या काळात झालेल्या सर्व जखमा या टीझरने ताज्या केल्या आहेत.
हेही वाचा - 'हर हर महादेव' सिनेमाचा वाद आणखी चिघळला; संभाजी ब्रिगेडकडून कायदेशीर नोटीस
भारत लॉकडाऊनची कथा दिल्ली, मुंबई सारख्या महानगरांमध्ये कामासाठी येणाऱ्या स्थलांतरित मजुरांभोवती फिरताना दिसणार आहे, ज्यांनी साथीच्या आजारामुळे पायी शहरांमधून स्थलांतर करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाच सईसोबत प्रतीक बब्बर, प्रकाश बेलवडी, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमराहे हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, हा चित्रपट पुढील महिन्यात 2 डिसेंबर 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये देशातील साथीच्या आजारामुळे उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्यांची कहाणी सांगितली जाईल. या चित्रपटाची निर्मिती डॉ. जयंतीलाल गडा यांच्या पेन स्टुडिओने मधुर भांडारकर यांच्या सहकार्याने केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरातील देशांनी आपापल्या ठिकाणी अंतर्गत लॉकडाऊन लागू केले होते. लॉकडाऊन असूनही जगभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत होती, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोक उदरनिर्वाहासाठी धडपडताना दिसत आहेत, याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्याने देश हादरला. पुन्हा एकदा या लॉकडाऊनचा अनुभव आपल्याला 'इंडिया लॉकडाऊन' चित्रपटातून घेता येणार आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी देशाच्या समस्या सांगणारा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे आता चित्रपट कितपट प्रेक्षकांना कनेक्ट करतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Lockdown, Sai tamhankar, Upcoming movie