मुंबई 15 ऑगस्ट: आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक मराठी कलाकार भारत देशाशी असलेलं त्यांचं स्पेशल नातं शेअर करत आहेत. अनेक कलाकार तिरंग्यासह फोटो शेअर करून काही आठवणी काही खास मेसेज शेअर करताना दिसत आहे. या सगळ्यात उत्कर्ष शिंदे या गायकाने केलेली पोस्ट मात्र बरीच viral होत आहे. आजच्या स्वातंत्र्यदिनी त्याला एक अत्यंत स्पेशल व्यक्ती भेटली असल्याचं समोर आलं आहे. आपल्या सगळ्यांनाच सिग्नलवर पैसे मागणारे तृतीयपंथी दिसत असतात. काहीजण त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागतात तर काहीजण बेफिकिरीने त्यांना दुर्लक्षित समजतात. याच विचारसरणीबद्दल व्यक्त होत उत्कर्षने (utkarsha shinde instagram) एक स्पेशल पोस्ट लिहिली आहे. तो असं लिहितो, “आज तुला पाहिल आणि विचार बदलले ……🙏🏻💐 “जो भरा नहीं है भावों से, जिसमें बहती रसधार नहीं । वह हृदय नहीं है पत्थर है, जिसमें स्वदेश का प्यार नहीं।” राष्ट्रप्रेम सर्वोच्च प्रेम म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तिला आपल्या जन्मभूमी वर निस्वार्थ प्रेम असावे. आज सिग्नल ला माझी कार थांबली आणि समोर तू दिसलीस,तुला पाहून खरंच संकुचित विचारांच्या लोकांना तू आज चपखल उत्तर दिलंस . कोण तू ? कुठली तू ? तू नर ? कि नारी? ,ह्या वरून तुझे परीक्षण आज पर्यंत भवताल च्या बऱ्याच लोकांनी केले असेल . पण तू त्यांच उत्तर “तू प्रथम भारतीय " आहेस हे तू आज तुझ्या पेहेराव्यातूनच नाही तर तुझ्या बोलण्यातून ठासून दाखवलंस .कार ची काच मी जेव्हा खाली घेतली आणि तू हसत किती सकारात्मकतेने “साहब भारत माता कि जय हो " म्हणालीस.
आणि पैसे नहीं चाहिये आज .आज सिर्फ दुआ दूंगी म्हणत डोक्यावरून हाथ फिरवलास आणि प्रवास भर मी तुझ्यातल्या माणुसकीला ,देश प्रेमाला मनोमन सलाम करत राहिलो . 75व्या स्वातंत्र्य दिनी आज खरंच भासल बुरसटलेल्या भेद भाव मानणाऱ्या,माणसाला माणसा पासून दूर ठेवणाऱ्या विचारानं पासून काहींना अजूनही स्वातंत्र्य मिळणे बाकी आहे . #azaadikaamritmahotsav” हे ही वाचा- Amruta Subhash: आजीनं अनुभवला होता देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन; अमृताने सांगितली ‘ती’ गोड आठवण देशात तृतीयपंथी समजाबद्दल आजही असलेले विचार आणि गैरसमज यावर उत्कर्षने हिली ही समर्पक पोस्ट अनेकांना प्रेरणा देणारी आणि त्यांचे डोळे उघडणारी आहे. त्याच्या या पोस्टला भरभरून प्रेम मिळत असून त्यातली शिकवण फार मोलाची आहे अशी प्रतिक्रिया समोर येत आहे.