मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अनुराग-तापसीच्या समस्यांमध्ये वाढ; इन्कम टॅक्सच्या छाप्यानंतर ED करणार चौकशी

अनुराग-तापसीच्या समस्यांमध्ये वाढ; इन्कम टॅक्सच्या छाप्यानंतर ED करणार चौकशी

आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकले. मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. परंतु या दोन्ही कलाकारांच्या समस्या अद्याप संपलेल्या नाहीत.

मुंबई 4 मार्च: देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर रोखठोक प्रतिक्रिया देणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap ) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pann) यांच्या घरावर आयकर विभागानं (Income Tax Department) धाड टाकली. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकले. मात्र या कारवाईत त्यांच्या हाती अक्षेपार्ह अशी कुठलीही गोष्ट लागली नाही. परंतु या दोन्ही कलाकारांच्या समस्या अद्याप संपलेल्या नाहीत. यापुढे आता सक्तवसुली संचलनाद्वारे (ED) देखील त्यांची चौकशी केली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार या धाडीदरम्यान आयकर विभागानं कलाकारांचे फोन आणि लॅपटॉप जप्त केले. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईजची फॉरंसिक चाचणी केली जाणार आहे. शिवाय त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स, वॉट्सअप चॅट, इमेल या गोष्टी देखील तपासून पाहिल्या जातील. या छापेमारीदरम्यान आयकर पथकाच्या हाती अद्याप कुठलीही आक्षेपार्ह माहिती लागलेली नाही. परिणामी येत्या काळात ईडीद्वारे देखील त्यांची चौकशी केली जाऊ शकते. शिवाय मुंबईतील तब्बल 22 ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.

अवश्य पाहा - ‘सरकारला लाज वाटली पाहिजे’; वाढत्या इंधन दरामुळं प्रकाश राज संतापले

'फँटम फिल्म'आणि 'क्वान' या कंपन्यांशी संबंधित असलेल्यांवर हे छापे टाकण्यात आले. त्यांनी कर चोरी केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं आयकर विभागानं म्हटलं आहे. या कर चोरी प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही आयकरनं म्हटलं आहे. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचं वितरण करण्याचं काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी 2011 मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी 2018 मध्ये बंद करण्यात आली होती.

First published:

Tags: Anurag kashyap, Crime news, Marathi entertainment, Taapsee Pannu