जयाच्या अगोदर दिल्लीच्या 'या' मुलीवर जडला होता अमिताभ यांचा जीव

जयाच्या अगोदर दिल्लीच्या 'या' मुलीवर जडला होता अमिताभ यांचा जीव

बिग बी ज्यावेळी दिल्लीमध्ये कॉलेजला होते त्यावेळी एका मुलीवर त्यांचा जीव जडला होता. या शो दरम्यान अमिताभ यांनी तो किस्सा सर्वांना सांगितला.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर : सध्या अमिताभ बच्चन त्याचा टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती'मुळे खूप चर्चेत आहेत. या शोमध्ये स्पर्धकांशी संवाद साधत असतानाच बिग बी आपल्या आयुष्यातील किस्सेही शेअर करत असतात. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या तरुण वयातला एक किस्सा शेअर केला. बिग बी ज्यावेळी दिल्लीमध्ये कॉलेजला होते त्यावेळी एका मुलीवर त्यांचा जीव जडला होता. या शो दरम्यान अमिताभ यांनी तो किस्सा सर्वांना सांगितला.

अमिताभ यांना हा प्रसंग KBC 11 मध्ये एका प्रश्नाच्या उत्तरावेळी आठवला. त्यानी गोस्वामी तुलसीदास यांची चौपाई रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाए पर .... न जाई, या ठिकाणी ...च्या जागी कोणता शब्द येईल असा प्रश्न होता. याचं अचूक उत्तर होतं 'वचन'

TRP मीटर : प्रेक्षकांचा कौल कायम, 'या' मालिकेनं मारली बाजी

DTC च्या बसमध्ये दोघंही पाहायचे एकमेकांची वाट

या चौपाईशी संबंधित एक किस्सा अमिताभ यांनी शेअर केला. जे ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अमिताभ बच्चन जेव्हा  दिल्ली युनिव्हर्सिटीच्या किरोड़ीमल कॉलेजमध्ये शिकत होते. यावेळी ते डीटीसी बसमधून प्रवास करत असत. त्यावेळी त्यांना रोज एक मुलगी भेटत असे.

Bigg Boss 13 : शोमध्ये होणार मोठे बदल, 'असा' असेल नवा सीझन

अमिताभ यांच्या मते, डीटीसी बस कनॉट प्लेस येण्याची ते आतुरतेनं वाट पाहत असत कारण त्याठिकाणी अनेक सुंदर मुली बसमध्ये चढत असत. त्याठिकाणी दुसऱ्या कॉलेजच्या मुलीसुद्धा चढत असत. त्यावेळी त्यापैकी एक मुलगी अमिताभ बच्चन यांना आवडू लागली होती.

अमिताभ सांगतात, 'त्या काळी मुलींसोबत आत्ताच्यासारखं बोलता येत नसे. त्यामुळे मी तिच्याशी बोलू शकत नव्हतो. पण  काही वर्षांनी जेव्हा ती मुलगी मला अचानक भेटली त्यावेळी तिला मी हे तिला सांगितलं.'

लता दीदींच्या प्रतिक्रियेवर हिमेश रेशमियानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

त्यावेळी त्या मुलीचा आणखी एक मित्र होता. त्याचं नाव होतं प्राण. ते दोघंही नेहमी एकत्र त्या बसमध्ये चढत असत. मात्र त्या मुलीला नेहमी असं वाटत राहिलं की, प्राण जाए पर 'बचन' ना जाए. त्या मुलीनं स्वतःचं या गोष्टीची कबुली दिली होती की, बसमध्ये अमिताभ यांच्यासाठी तिच्या मनातही खास भावना होती. अमिताभसाठी ती तिचा मित्र प्राणलाही सोडायला तयार झाली होती.

======================================================

VIDEO: आता शत्रूची काय बिशाद! भारतीय लष्कराचा ताफा आणखी मजबूत होणार

Published by: Megha Jethe
First published: September 12, 2019, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading