Home /News /entertainment /

VIDEO: 'तुला हिंदी येते का?' पापाराझीच्या या प्रश्नावर पाहा काय म्हणाली समंथा

VIDEO: 'तुला हिंदी येते का?' पापाराझीच्या या प्रश्नावर पाहा काय म्हणाली समंथा

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री (South Actress) समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

  मुंबई,11 मार्च-  साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री   (South Actress)   समंथा रुथ प्रभू   (Samantha Ruth Prabhu)  सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्री पुष्पा  (Pushpa: The Rise) चित्रपटातील 'ओ अंटावा'  (O Antava)  या गाण्यामुळे विशेष लोकप्रिय झाली आहे. आज फक्त साऊथमध्येचच नव्हे तर देशासह विदेशातही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आजही अभिनेत्री एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. नुकतंच अभिनेत्रीला एका पापराझीने तुला हिंदी येतं का? असा प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिलं तुम्हीच वाचा. साऊथ चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून समंथा प्रभूची ओळख आहे. समंथा सध्या हिंदीतसुद्धा सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'फॅमिली मॅन 2' या वेबसीरीजमुळे ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली होती. समंथा अनेकवेळी पब्लिक प्लेसवर दिसू येते. ती आपल्या चाहत्यांशीसुद्धा तितक्याच आपुलकीने भेटते. नुकतंच अभिनेत्रीला पापाराझींनी एयरपोर्टवर स्पॉट केलं होतं. यादरम्यान अभिनेत्रीला आपल्या चाहत्या असलेल्या दोन मुलींना सेल्फी देताना दिसली. यावेळी पापाराझींनी तिला आपल्या कॅमेरातसुद्धा कैद केलं.
  प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री आपल्या चाहत्यांना सेल्फी देताना दिसत आहे. त्यांनतर ती जात असते. त्याचवेळी एक पापराझी समंथाला प्रश्न विचारत म्हणतो, 'मॅम तुम्हाला हिंदी येतं का?' यावर समंथा हसू लागते. आणि गोड उत्तर देत म्हणते हो थोडं थोडं येतं'. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्रींचे चाहते यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे, 'किती गोड आहेस'. तर दुसऱ्याने लिहिलं, 'किती शांत स्वभाव आहे'. तर एकाने असंही लिहिलंय, 'बॉलिवूड प्रोजेक्ट येत आहे का?' (हे वाचा:जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समंथा आहे दुसऱ्या स्थानावर, मग पहिली कोण?) समंथा रूथ प्रभू ही साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. अभिनेत्रीची लोकप्रियता फारच वाढली आहे. चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी धडपडत असतात. दरम्यान अभिनेत्री नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटामुळेसुद्धा चर्चेत आली होती. या दोघांच्या चाहत्यांना या गोष्टीचा धक्का बसला होता. अभिनेत्री सध्या आपल्या करिअरवर लक्ष देत आहे. ती लवकरच शाकुंतलम आणि इतरही काही चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, South actress, Video viral

  पुढील बातम्या