30जून: ‘गोलमाल अगेन’मधून कॉमेडी चित्रपटांमध्ये परत येणाऱ्या तब्बूनं एक गौप्यस्फोट केलाय. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘अजय देवगणमुळे मी सिंगल आहे आणि त्यानं माझ्यासोबत जे केलं त्याचा त्याला पश्चात्ताप होवो’. ‘गोलमाल अगेन’मध्ये तब्बू आणि अजय 23 वर्षांनी एकामेकांसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. रील लाईफमध्ये तो कितीही चांगला असला तरीही रियल लाईफमध्ये त्याच्यामुळेच मी सिंगल आहे असं तब्बू म्हणाली. अजय तब्बूच्या चुलत भावाचा शेजारी आणि जवळचा मित्र होता. तिच्या चुलत भावामुळेच तिची अजयशी ओळख झाली. ते दोघंही तिला फॉलो करायचे आणि कुठल्याही मुलानं तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर त्याला धमकवायचे.तो प्रचंड प्रोटेक्टिव्ह असल्याचंही तिनं सांगितलं. यापुढच्याच वाक्याला तिनं तिचं ‘सिंगल’ स्टेटसचं कारण हसण्यावारी नेलं.ती असंही म्हणाली की माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर शोधण्याची जबाबदारी मी अजयवरच टाकलीय. गोलमाल अगेनच्या सेटवर दोघांनी खूप धमाल केल्याचंही तिनं सांगितलं. आता खरच तब्बूला हवा तसा जोडीदार अजय शोधतो का हे येणारा काळच ठरवेल .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.