मुंबई, 31 मे: हम गरीब हुए तो क्या हुआ ! चला, हवा येऊ द्या ! नया है वह! आई बाबा आणि साईबाबाची शपथ असे हिट डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडात असलेला एकमेव सिनेमा म्हणजे टाईमपास (Timepass) दगडू - प्राजूची लव्ह स्टोरी, त्या स्टोरीतला कोंबडा, मलेरिया, बालभारती, शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी प्रेक्षकांना अक्षर: वेड लावलं. टाइमपास आणि टाइमपास २ (Timepass 2) च्या उत्फुर्त प्रतिसादानंतर रवी जाधव दिग्दर्शित 'टाईमपास 3' (Timepass 3) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाची पहिली झलकच प्रेक्षकांना वेड लावून गेली. हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळाला. प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Timepass 3 Teaser) टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास २ मध्ये पूर्ण झाली. आता या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री हृताचा (Hruta Durgule) रावडी लुक पाहून प्रेक्षक चांगलेच हैराण झाले आहेत.
टाइमपास 3 ची ही गोष्ट दगडू-प्राजुच्या लग्नानंतरची नाहीये तर त्या आधीची आहे म्हणजे कुमारवयातल्या दगडूची ! आणि या कथेत आला आहे नवा ट्विस्ट ज्याचं नाव आहे ' पालवी दिनकर पाटील'! टाइमपास ३ च्या टिझरच्या केंद्रस्थानी आहे ही डॅशिंग पालवी ! जी साकारली आहे लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने.
हेही वाचा - बहुचर्चित 'अनन्या'चा टीजर रिलीज, यादिवशी रिलीज होणार हृता दुर्गुळेचा सिनेमा
याशिवाय प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले यांचा माधव लेले उर्फ शाकाल हे पात्र या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट काय असणार आहे ? ही पालवी कोण आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 29 जुलैला प्रेक्षकांना मिळणार आहेत.
1 मिनीटे 16 सेकंदाच्या टिझरने धम्माल उडवून दिली आहे. मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी मागच्या दोन्ही सिनेमात चांगलीच धमाल उडवून दिली. टाइमपास 3 मध्ये अशीच धम्माल गाणी पाहता येणार आहे. टिझरमधूनच एका गाण्याची झलक पाहायला मिळाली आहे. टाइमपास 3 ची घोषणा झाल्यापासूनच सर्वांना पडलेला एक प्रश्न म्हणजे सिनेमात प्राजू दिसणार का? टिझरमधून तरी प्राजू दिसली नाहीये पण प्राजू दिसणार की नाही याची उत्तरे हळूहळू मिळतच जातील. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे हे निश्चित !
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्सनी सिनेमाची निर्मिती केली आहे. तर रवी जाधवने टाइमपास ३ चे दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात पुन्हा एकदा छोटा दगडू म्हणजे अभिनेता प्रथमेश परब दिसणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब ही जोडी प्रेक्षकांचा कसा टाइमपास करणार हे 29 जुलैला कळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Ravi Jadhav, Timepass