मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Timepass 3 च्या प्रीमियरला हृताच्या सासूची हजेरी, स्टायलिश अंदाजात दिसल्या सासू सुना, पाहा VIDEO

Timepass 3 च्या प्रीमियरला हृताच्या सासूची हजेरी, स्टायलिश अंदाजात दिसल्या सासू सुना, पाहा VIDEO

टाइमपास 3च्या प्रीमियरला अभिनेत्री हृताची सासू मुग्धा शाह यांनी हजेरी लावली होती. सासू सुनांचा हटके अंदाज प्रीमियरला पाहायला मिळाला.

टाइमपास 3च्या प्रीमियरला अभिनेत्री हृताची सासू मुग्धा शाह यांनी हजेरी लावली होती. सासू सुनांचा हटके अंदाज प्रीमियरला पाहायला मिळाला.

टाइमपास 3च्या प्रीमियरला अभिनेत्री हृताची सासू मुग्धा शाह यांनी हजेरी लावली होती. सासू सुनांचा हटके अंदाज प्रीमियरला पाहायला मिळाला.

  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 29 जुलै: संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावण्यासाठी 'टाइमपास 3' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित टाइमपास 3 सिनेमाचा प्रीमियर आज मुंबईत मोठ्या दिमाखात पार पडला.  प्रीमियरला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. हृतासाठी तर टाइमपास 3 हा सिनेमा फारचं खास ठरला आहे. कारण सिनेमाच्या प्रीमियरला हृताचा नवरा प्रतीकनं तर हजेरी लावलीच मात्र त्याच्याबरोबर हृताची सासू म्हणजेच अभिनेत्री मुग्धा शाह यांनी हजेरी लावली होती. सासूला प्रीमियरला पाहून हृता भलतीच खुश झाली होती. सासू सुनेचा हटके अंदाज प्रीमियरला पाहायला मिळाला.

सूनेच्या नव्या सिनेमाच्या प्रीमियरला येण्यासाठी मुग्धा शाह देखील प्रचंड उत्सुक असल्याचं दिसलं. टाइमपास 3 च्या प्रीमियरमधील सासू सुनेचा एक व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोघी मस्त स्टायलीश अंदाजात दिसत आहेत. मुग्धा आणि हृता देखील सासू सुना कमी आणि मैत्रिणीच जास्त आहेत,असं पाहायला मिळालं. सासू सुनेचं नात किती घट्ट आहे हे व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

हेही वाचा - Hruta Durgule: महाराष्ट्राच्या क्रशचा असाही अवतार; Timepass 3 मधली हृताची कडक गाणी पाहिलीत का?

सासू सुनेची हटके जोडी एकत्र पाहून प्रेक्षकांनीही आनंद व्यक्त केलाय. हृताच्या चाहत्यांनाही सासू सुनेची ही जोडी पसंतीस पडली आहे. टाइमपास 3 च्या प्रीमियरला, सिनेमातील संपूर्ण स्टारकास्टसह गायिका आर्या आंबेकर, हृताचा नवरा प्रतिक शाह यांच्यासह सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी उपस्थित होती.

हृताची सासू मुग्धा शाह यांच्याविषयी सांगायचं झालं तर, अभिनेत्री मुग्धा शाह या मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचा ओळखीचा चेहरा आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.  'बे दुणे साडे चार', 'मिस मॅच', 'माहेर माझं हे पंढरपूर', 'संभव असंभव' सारख्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. मुग्धा या कमालीच्या फिट आहेत.  तर हृता नवरा प्रतीक शाह देखील हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध 'बेहद 2', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदडी', 'इक दिवाना था' सारख्या मालिकांवर काम  केलं आहे. तो उत्तम दिग्दर्शक आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Time pass marathi movie