मुंबई, 25 ऑगस्ट: अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ठरली आहे. मालिका सिनेमा नाटक आणि आता हृतानं तिच्या पहिल्या वेब सीरिजचीही घोषणा केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आताची आघाडीची अभिनेत्री म्हणून हृताचं नाव आहे. हृतानं झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी दीपू आजही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ठरली आहे. अभिनेत्री हृता पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या नव्या कार्यक्रमात या आठवड्यात हृता पाहुणी म्हणून येणार आहे. यावेळी हृतानं अनेक प्रश्नांची भन्नाट उत्तर दिली आहेत. दरम्यान आतापर्यंत तिनं मालिकेत केलेल्या सोज्वळ भूमिकांविषयी तिनं तिचं मत व्यक्त केलं आहे. बस बाई बसचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात हृता सूत्रसंचालक सुबोध भावेच्या प्रश्नांची होय की नाही अशी उत्तर देताना दिसत आहे. हृताचा न पाहिलेला अंदाज यावेळी प्रेक्षकांना बस बाई बसच्या मंचावर पाहायला मिळणार आहे. सुबोधनं त्याच्या प्रश्नांमधून हृताला बोलत करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मालिकेतील हिरोइन सोज्वळचं दाखवावी लागते?’, असा प्रश्न सुबोधनं हृताला विचारला. त्यावर हृतानं तोंड वाकड करत ‘हो’ असं उत्तर दिलं. त्यावर सुबोधनं हृताला ‘होय, आक्षेप आहे याच्यावर? वाईट वाटतं?’, असा प्रश्न विचारला. त्यावर हृतानं अगदी लटकी मान डोलावत उत्तर दिलं. हेही वाचा - Hruta Durgule Bus Bai Bus: सिनेमातील कलाकार मालिकेतील कलाकारांना कमी लेखतात? हृतानं केला खुलासा
सुबोधच्या प्रश्नावर हृतानं तिचं मत सांगितलं ती म्हणाली, ‘हो मालिकेतील हिरोईन सोज्वळचं लागते. नाहीतर ती खरी नाही वाटत. मुली तशा नसतात खरं तर’. यावर सुबोधनं हृताला ‘सोज्वळ मधल्या सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा कंटाळा येतो’, असा प्रश्न केला. त्यावर हृता हटके उत्तर देत म्हणाली, ‘सगळ्यांना कसं सगळं माफ करायचं. असं कसं, इतकं कसं मन मोठं असेल? थोडं वाईट वाटू शकतं. प्रत्येक हिरोइन सगळं माफ करू शकते. पण मी नाही अस करू शकत’. हृताच्या उत्तरानंतर सुबोधनं देखील जास्त न ताणता थेट पुढचा प्रश्न हृताला विचारला. बस बाई बसच्या प्रोमोमध्ये हृताची उत्तर ऐकून प्रेक्षकांची एपिसोड पाहण्याची उत्सुकता चांगलीच ताणली आहे. प्रोमो पाहून अनेकांनी एपिसोडची उत्सुकता दाखवली आहे