जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / टीव्हीवरील प्रसिद्ध नायिका दीपू-अप्पू येणार एकत्र; काय आहे कारण?

टीव्हीवरील प्रसिद्ध नायिका दीपू-अप्पू येणार एकत्र; काय आहे कारण?

टीव्हीवरील प्रसिद्ध नायिका दीपू-अप्पू येणार एकत्र; काय आहे कारण?

‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे होय. छोट्या पडद्यावरून ब्रेक घेत हृता आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लवकरच तिचे ‘टाईमपास 3’ आणि ‘अनन्या’ असे दोन दमदार चित्रपट रिलीज होणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै-   ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे होय. छोट्या पडद्यावरून ब्रेक घेत हृता आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लवकरच तिचे ‘टाईमपास 3’ आणि ‘अनन्या’ असे दोन दमदार चित्रपट रिलीज होणार आहेत. तत्पूर्वी ती आपल्या डेब्यू चित्रपटांसाठी जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान अभिनेत्री आता आपल्या 22 जुलैला रिलीज होणाऱ्या ‘अनन्या’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्ही मालिकांमध्ये हजेरी लावणार असल्याचं दिसून येतं. हृता लवकरच स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच १७ जुलै रोजी या मालिकेचा महाएपिसोड प्रक्षेपित केला जाणार आहे. यामध्ये हृताची उपस्थिती दिसून येणार आहे. त्यानिमित्ताने छोट्या पडद्यावरील दोन लोकप्रिय व्यक्तिरेखा दीपू (मा उडू उडू झालं) आणि अप्पू एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. ‘अनन्या’मधून हृताची मोठ्या पडद्यावर एन्ट्री- ‘अनन्या’चे दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी.आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल, हे मी खात्रीने सांगतो. अनन्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.’’ **(हे वाचा:** Man Udu Udu Jhala: कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात दीपूचा इंद्राजींसाठी सुरेख उखाणा; तुम्ही ऐकालात का? )

जाहिरात

तसेच हृता दुर्गुळे सध्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळेसुद्धा प्रचंड चर्चेत आहे. कारण ही झी मराठीवरील एक प्रसिद्ध मालिका आहे. मात्र ही मालिका येत्या काही दिवसांत निरोप घेणार आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग =देखील पूर्ण झालं आहे. सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चित्रपटांच्या प्रमोशनमुळे हृताला मालिकेसाठी पुरेसा वेळ देणं शक्य होत नाहीय. त्यामुळे निर्मात्यांनी थेट मालिकाच बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात