जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : ह्रता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात, 'टाईमपास 3'चा फर्स्ट लुक आला समोर

VIDEO : ह्रता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात, 'टाईमपास 3'चा फर्स्ट लुक आला समोर

VIDEO : ह्रता दुर्गुळे दिसणार दबंग अंदाजात, 'टाईमपास 3'चा फर्स्ट लुक आला समोर

टाईमपास 3 या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री ह्रता दुर्गुळेचा दबंग अंदाज पाहायला मिळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 मे- टाईमपास आणि टाईमपास 2 या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना टाईमपास 3  ( timepass 3 ) पाहायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर बदाम तिर्रीचे पान शेअर करत या चित्रपटाविषयी सांगितले होते. आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहाणाऱ्या लोकांसाठी गुडन्यूज आहे. टाईमपास 3 या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री ह्रता दुर्गुळेचा (hruta durgule ) दबंग अंदाज पाहायला मिळत आहे. नुकताच एका पोर्टलनं टाईमपास 3 या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री ह्रता दुर्गुळेचा दबंग अंदाज पाहायला मिळत आहे. आपल्या दोस्ताला जो नडेल त्याचा आपण मार्बल फोडेल..अशा अंदाजात तिची एंट्री होताना दिसत आहे. नेहमी साध्याभोळ्या भूमिकेत दिसणाऱ्या ह्रता दुर्गुळेचा यामध्ये टपोरी अंदाज पाहायला मिळत आहे. शिवाय प्रथमेस परब, वैभव मांगलेकर यांच्या लुकची देखील पहिली झलक देखील पाहायला मिळत आहे. लवकरत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. चाहत्यांना देखील ह्रता दुर्गुळेला वेगळ्या अंदाजात आणि मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागली आहे. वाचा- ‘मुंबईकर असल्याचा अभिमान..’ या अभिनेत्याने 3 वर्षांनी केला लोकलने प्रवास केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब यांची मुख्य भूमिका असलेल्या टाईमपास या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची कथा, चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यानंतर प्रेक्षकांना काही वर्षांनी टाईमपास 2 हा चित्रपट पाहायला मिळाला.

जाहिरात

या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आता यानंतर टाईमपास 3 चा फर्स्ट लुक समोर आला आहे. आता या सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात